चांदोरी : दिल्ल्ीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निफाड तालुक्यातील चांदोरी येथे छावा क्रांतिवीर सेना व किसानसभेच्यावतीने शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नाशिक - औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनच्यावतीने देशभर चक्का जाम करण्याची हाक देण्यात आली होती. या हाकेला साथ देत छावा क्रांतिवीर सेना व किसान सभेच्यावतीने शनिवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली. आंदोलन सुमारे तासभर सुरू राहिल्याने नाशिक - औरंगाबाद महामार्गवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलना दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू न देण्यासाठी सायखेडा पोलीस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्याकडे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित होते. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देत आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
चांदोरी येथे चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 1:37 PM