नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनांतर्गत द्वारका येथे छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे ठिय्या मांडला. छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हातात भगवे झेंडे घेऊन सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास द्वारका गाठली. पुणे महामार्गाच्या दिशेने कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करत झेंडे फिरवून सुमारे पन्नास ते शंभर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी भद्रकाली, मुंबई नाका पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले. सुमारे वीस मिनिटे आंदोलकांनी वाहतूक रोखल्यामुळे पुणे महामार्ग, मुंबई - आग्रा महामार्गासह सारडा सर्कल रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)
द्वारका चौकात चक्का जाम आंदोलन
By admin | Published: February 01, 2017 1:19 AM