शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम

By admin | Published: February 01, 2017 1:25 AM

मराठा समाजाची एकजूट : कळवण, सटाणा, देवळा, उमराणे, नामपूरला आंदोलन

नाशिक : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करून चक्का जाम आंदोलन मागे घेतले. सटाणा : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता करंजाडी, मोसम खोऱ्यातील मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन करंजाड गावाजवळील चौफुलीवर ठिय्या देऊन विंचूर - प्रकाशा राज्यमार्ग रोखून धरला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत सोनवणे, रवींद्र भामरे, कृष्णा धर्मा भामरे, पंकज भामरे यांनी समाजाच्या मागण्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण विजयकुमार ठाकूरवाड यांना सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात पिंगळवाडे येथील केदा भामरे, केवळ देवरे, आबा देवरे, शरद देवरे, पंडित देवरे, राकेश देवरे, विजय देवरे, आबा भामरे यांच्यासह पिंगळवाडे, मुंगसे, करंजाड, भुयाणे, निताणे, पारनेर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा, ब्राह्मणपाडे, बिजोटे, आखतवाडे परिसरातील समाजबांधव सहभागी झाले होते.  देवळा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज देवळा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. देवळा येथे पाचकंदिल चौकात रास्ता रोको करण्यात आले. कोपर्डी घटनेच्या आरोपींना फाशी, मराठा समाजाला आरक्षण, शेतमालाला योग्य भाव मिळावा आदि विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले चक्का जाम आंदोलन सकाळी साडेदहा वाजता सुरू झाले. पाऊण तास आंदोलन सुरू होते. यावेळी शहादा - प्रकाशा मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. जितेंद्र अहेर व उदय अहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, जितेंद्र अहेर, उदय अहेर, राजेश अहेर, बाबाजी निकम, सुनील अहेर, अतुल अहेर, मुन्ना आहिरराव, राजेंद्र देवरे, किशोर अहेर, अनिल अहेर, अण्णा अहेर, विजय अहेर, रवींद्र सावकार, शांताराम अहेर, राजेंद्र देवरे, किशोर अहेर आदिंसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांसह इतर समाजाचे तरुण व नागरिक उपस्थित होते. देवळा येथे आंदोलनकर्त्यांच्या वतीने दोन विद्यार्थिनींच्या हस्ते प्रशासनास निवेदन देण्यात आले.उमराणे : विविध मागण्यां-संदर्भात शासनाला जाग आणण्यासाठी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३वर सकल मराठा समाज मोर्चाच्या वतीने एक तास चक्का जाम करण्यात आले. मागण्यांचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल विभागाचे मंडल अधिकारी बी.व्ही. अहिरराव यांना देण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळी १० वाजता गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सव्वादहा वाजता उमराणेसह परिसरातील सकल मराठा समाज एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते प्रदीप देवरे व नंदन देवरे यांनी भाषणे केली. यात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले व समाजबांधवांच्या भावना तसेच मागण्या शासनाकडे पाठविण्यात आल्या; परंतु या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्षच केल्याने शासनास जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून, जोपर्यंत शासन मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत विविध मार्गाने लढा सुरूच राहणार असून, शासनास दिलेल्या निवेदनात कोपर्डी घटनेसह महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी देण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करावा, ईबीसी सवलतींसाठी ६० टक्केवारीची अट रद्द करावी, बाबा पुरंदरेला दिलेला महाराष्ट्र पुरस्कार रद्द करावा आदि मागण्या करण्यात आल्या असून, या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रास्ता रोको आंदोलनप्रसंगी बाजार समितीचे सभापती विलास देवरे, खंडूकाका देवरे, मोतीराम देवरे, देवानंद वाघ, भाऊसाहेब देवरे, दत्तू देवरे, भरत देवरे, सुदाम देवरे, सुभाष देवरे, सचिन देवरे, भगवान देवरे, मोठाभाऊ देवरे, उमेश देवरे, रूपेश जाधव, बाळा पवार, सुनील देवरे, राजेंद्र देवरे, राकेश जाधव, चिंतामण देवरे आदिंसह शेकडो मराठा समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्यासह बहुतांशी पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.