शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
3
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
4
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
5
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
6
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
7
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
8
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
9
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
10
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
11
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
12
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
13
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
14
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
15
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
16
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
17
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
18
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
19
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
20
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान

चक्रधर स्वामींचे कार्य समाजासाठी प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:23 IST

निफाड : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञानप्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मराठी भाषेतून सांगितले. इतकेच नव्हे तर धार्मिक कार्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीयांना नसून समाजातील सर्वच स्त्री पुरुषांना आणि सर्वसामान्य जनतेला आहे, असा संदेश दिला, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे आचार्य महंत बिडकर बाबा शास्त्री यांनी केले.

ठळक मुद्देमहंत बिडकर बाबा : अष्टशताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात

निफाड : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञानप्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मराठी भाषेतून सांगितले. इतकेच नव्हे तर धार्मिक कार्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीयांना नसून समाजातील सर्वच स्त्री पुरुषांना आणि सर्वसामान्य जनतेला आहे, असा संदेश दिला, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे आचार्य महंत बिडकर बाबा शास्त्री यांनी केले.निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्हास्तरीय श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव व जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करीत संपन्न झाला. यावेळी आचार्य महंत बिडकर बाबाजी म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींनी त्या काळातील प्रस्थापित धर्म व्यवस्थेची कर्मकांडाची चौकट मोडून महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा पाया रचला. श्री स्वामींनी त्या काळात सर्व महाराष्ट्रभर परिभ्रमण करून स्त्री-पुरुष समानता, अहिंसेचा संदेश, सर्व व्यसनांपासून दूर राहणे, तसेच वर्णभेदावर देखील स्वामींनी प्रहार केले. त्यानंतरच्या आचार्यांनी स्वामींचे हे मोलाचे कार्य सर्व समाजात पोहोचविले. आजही स्वामींचे हे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायक आहे. तसेच गेल्या सातशे वर्षांपासून महाराष्ट्रात पंथाचे कार्य निरंतर सुरू आहे, असेही आचार्य महंत बिडकर बाबाजी यांनी सांगितले.याप्रसंगी महंत न्यायव्यास बाबा (मकरधोकडा जि. नागपूर ) यांनी महानुभाव पंथाचे कार्य तसेच श्री चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याचा सखोल परिचय करून दिला. त्याचप्रमाणे महानुभावची काशी असलेल्या श्रीक्षेत्र रुद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी भाषा तत्त्वज्ञान अध्ययन केंद्राची स्थापना होणार असल्याचे माहिती दिली. याप्रसंगी महंत श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी महंत अंकुळनेरकर बाबा, महंत संतोष मुनी शास्त्री, नीलेश दादा बिडकर आदींनी देखील विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.संत महंतांचा सन्मानअखिल भारतीय महानुभाव परिषद, नाशिक जिल्हा महानुभाव परिषद व चांदोरी ग्रामस्थ व सद्भक्त परिवार यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मसभेच्या प्रारंभी सकाळी देवास मंगलस्नान, भगवद्गीता पठान, पंथ ध्वजाचे पूजन व मानवंदना, सभामंडपाचे उद्घाटन देवास वंदन, संत महंतांचा सन्मान, आरती, विडा अवसर, देव पूजा, उपहार सोहळा आदी कार्यक्रम संपन्न झाले. 

टॅग्स :nifadनिफाडSocialसामाजिक