नाशिक : देशात कलाल समाजाची लोकसंख्या सहा कोटींच्या आसपास आहे. मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची ताकद दिसून येत नाही. तेव्हा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कलाल समाजाचे एकत्रीकरण, एकजूट होणे काळाची गरज असल्याचा सूर कलाल समाज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. कलाल समाज उन्नती मंडळाच्या वतीने अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली येथे कलाल समाज कार्यकर्ता यांचे एकदिवसीय कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली, त्यावेळी कलाल समाजातील विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. कार्यशाळेचे उद््घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडूसा गोपाळसा कलाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र कलाल, निश्चलसा दगडूसा गिरणार, भारत सोनवणे, जगदीश कलाल, जयंत कलाल, जितेंद्र बागुल, सदाशिव सूर्यवंशी, गणेश सोनवणे, सदाशिवसा कलाल, छबुसा कलाल, शेखर सोनवणे, संजय कलाल, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात कलाल समाजाचा सामाजिक अभ्यास या विषयावर जितेंद्र बागुल यांचे सादरीकरण झाले. नोकरी व कामधंद्यांच्या निमित्ताने इतरत्र विखुरलेल्या कलाल समाजाची सर्वेक्षणाच्या माध्यमातून सामाजिक स्थितीचा अभ्यास होणे गरजेच असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रदीप कलाल यांनी केले.रॅलीतील अनुभव कथन...राजेंद्र कलाल यांनी ‘कलाल समाजापुढील आव्हाने’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील कलाल समाजाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये काढण्यात आलेल्या नाशिक ते तळोदा (जि.नंदुरबार) या सायकल रॅलीतील अनुभव कथन या विषयावर दुपारचे सत्र घेण्यात आले. यावेळी श्रीमती रत्ना कलाल, चंद्रशेखर सोनवणे, सुरेश कलाल, संदीप कलाल, दिनेश बागुल, विजय कलाल यांनी आपले अनुभव कथन केले.
कलाल समाज एकजुटीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:05 AM