लोकमत विशेषनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत अल्पवयीन मुले-मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे चाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये लहान मुलींना चॉकलेटचे तर शाळकरी व महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनांचा समावेश आहे़ मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यामानाने मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे़अल्पवयीनांमध्ये विशेषत: लहान मुलींना चॉकलेट वा इतर खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून लैंगिक शोषण वा अत्याचार केले जात असल्याचे समोर आले आहे़ मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील एका शालेय परिसरात खेळत असलेली आठ वर्षीय मुलगी तर विद्यार्थिनींची ने-आण करणारा स्कूल व्हॅनचालक व्हॅनमधील दोन मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करीत होता़ राणेनगरच्या एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन वर्गशिक्षकच अत्याचार करीत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ या अत्याचाराच्या या घटनांमुळे शालेय वातावरही शालेय मुलींसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे़ शहरातील अल्पवयीन शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसविल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे़ यातील बहुतांश प्रकरणात तर मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ तसेच बहुतांश प्रकरणात ओळखीच्याच लोकांनी अल्पवयींनावर अत्याचार केले आहेत़ शहरातील शाळा तसेच खासगी शिकवणीच्या ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असून, याबरोबरच पालकांनीही मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे़शहर पोलिसांचा ‘से नो फर्स्ट’ उपक्रम लहान मुलांना लैंगिक अत्याचाराबाबत माहिती व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘से नो फर्स्ट’ हा उपक्रम राबविला जातो़ महिला पोलीस अधिकारी शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करतात़ लहान मुलांवर कशाप्रकारे अत्याचार होतात याची माहिती देऊन याबाबत पालकांकडे तक्रार करण्याचे तसेच संबंधित व्यक्तीस खडसावून नाही म्हणायला शिकण्याचे प्रशिक्षण दिले जाते़शाळेतील शिक्षक अद्यापही फरारअल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी नागरिकांनी बेदम मारहाण केलेला व पोलिसांत गुन्हा दाखल असलेला राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा शिक्षक सुनील कदम हा अद्यापही फरार आहे़ पोस्कोच्या गुन्ह्यात जिल्हा तसेच उच्च न्यायालयानेही कदमला जामीन नाकारल्याची माहिती पोलिसांनी दिली असली तरी अद्यापही त्याचा ठावठिकाणा शोधण्यास इंदिरानगर पोलिसांना यश आलेले नाही़महिला पोलीस अधिका-याकडून तपासशहर पोलीस आयुक्तालयातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात़ त्यामध्ये ‘से नो फर्स्ट’ तसेच महाविद्यालयातील मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे़ तसेच या प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र महिला अधिकाºयाची नेमणूक केली जाते़ - डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची ‘चाळिशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:33 AM