शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

देवळ्यात भाजपपुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:40 PM

संजय देवरे । देवळा : येथील नगरपंचायतीत भाजप आणि राष्टÑवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत तयार केलेल्या देवळा विकास आघाडीची ...

ठळक मुद्देराजकारण : विकास आघाडीची शक्यता धूसर, आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

संजय देवरे ।देवळा : येथील नगरपंचायतीत भाजप आणि राष्टÑवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत तयार केलेल्या देवळा विकास आघाडीची सत्ता अपक्षांच्या मदतीने प्रस्थापित केलेली असली तरी, मधल्या काळात स्थानिकसह राज्यपातळीवर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आगामी निवडणुकीत पुन्हा विकास आघाडीचा प्रयोग राबविला जाण्याची शक्यता धूसर बनली आहे. निवडणुकीत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरला गेल्यास भाजपला नगरपंचायतीतील वर्चस्व राखणे आव्हानात्मक ठरणार असून आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.गेल्या निवडणुकीत भाजपचे केदा आहेर व राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आहेर यांनी एकत्र येऊन विकासाला प्राधान्य देत देवळा विकास आघाडीची निर्मिती केली होती. कॉंग्रेसचे जितेंद्र आहेर व शिवसंग्रामचे उदयकुमार आहेर यांनी जनशक्ती पॅनलची निर्मिती केली तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्षाचे निवडणूक चिन्ह घेऊन सात प्रभागात उमेदवार रिंंगणात उतरले होते. पक्षाचे निवडणूक चिन्ह नसल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवार तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवितहोते.भाजपचे अधिकृत पॅनल नगरपंचायत निवडणुकीत नसल्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर या निवडणुकीपासून अलिप्त राहिले होते. निवडणूक निकालानंतर देवळा विकास आघाडीने १७ पैकी ८ जागा जिंकून आघाडी घेतली. सत्ता स्थापनेसाठी हे संख्याबळ मात्र पुरेसे नव्हते, परंतु चार अपक्ष नगरसेवकांनी देवळा विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे बहुमत मिळून नगरपंचायतीची सत्ता देवळा विकास आघाडीकडेआली.जनशक्ती पॅनलने विजय मिळविलेल्या पाच जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिन्ह घेउन दोन उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे अधिकृत पक्षाचे दोनच नगरसेवक व उर्वरित सर्व अपक्ष नगरसेवक अशी सरमिसळ बघावयास मिळालीहोती. नगरपंच्यायतीच्या स्थापनेनंतर प्रथम नगराध्यक्ष म्हणून धनश्री केदा अहेर यांची निवड झाली.दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत लोहोणेर गटातून धनश्री आहेर यांनी निवडणूक लढवित विजय मिळविला. यामुळे त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत केदा अहेर यांच्या भावजयी ज्योत्स्ना अहेर नगरसेवक झाल्या व सध्या त्या नगराध्यक्षपदी विराजमान आहेत.शिवसेनेची अस्तित्वाची लढाईराज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजप-शिवसेना युती तुटलेली आहे. यामुळे देवळा तालुक्यात यापूर्वी एकत्रित दिसणारे भाजप व शिवसेना हे चित्र आगामी नगरपंचायत निवडणुकीत बदलून शिवसेनेला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर तालुक्यातील काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे भाजपला आपले वर्चस्व राखणे आव्हानात्मक ठरणार आहे.पोटनिवडणुकीला स्थगितीशिवसंग्रामचे उदयकुमार आहेर यांनी देवळा नगरपंचायतीचे प्रथम उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशोक देवराम आहेर यांच्या विरोधात नगरपंचायतीच्या जागेवर अतिक्र मणासंदर्भात अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे नगरसेवकपद अपात्रतेसाठी विवाद अर्ज दाखल केला होता. दाव्याचा निकाल होऊन अशोक आहेर यांना या पुढील कालावधीसाठी नगरसेवक म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे प्रभाग क्र . ११ मध्ये पोटनिवडणूक कार्यक्र म नुकताच जाहीर झाला, परंतु अशोक आहेर यांनी त्यास स्थगिती आणली आहे.जि.प. निवडणुकीत आमनेसामनेनगरपंचायत निवडणुकीत देवळा विकास आघाडी पॅनलची निर्मिती करताना एकत्र आलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, व बाजार समितीचे माजी अध्यक्ष योगेश आहेर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत लोहोणेर गटात आपल्या अर्धांगिनींना निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उतरविले होते. त्यात धनश्री केदा आहेर यांनी बाजी मारत योगेश आहेर यांच्या पत्नी लीना आहेर यांना पराभूत केले. त्यामुळे आता आगामी नगरपंचायत निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा दोघे एकत्र येत देवळा विकास आघाडी निर्माण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण