शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

थेट लढतीने घोलप यांच्यापुढे आव्हान

By sandeep.bhalerao | Published: October 12, 2019 12:21 AM

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याची त्यांनी दाखविलेली जिद्द यामुळे घोलप यांना यंदाची निवडणूक गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्दे देवळालीत तीस वर्षानंतर बदलत्या समीकरणाने चुरस

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याची त्यांनी दाखविलेली जिद्द यामुळे घोलप यांना यंदाची निवडणूक गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात घोलप यांना नेहमीच मतविभागणीचा फायदा झालेला आहे किंबहुना त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकांना रिंगणात उतरवून तशी राजकीय खेळी यशस्वी करूनही दाखविलेली आहे. त्यांचे हे काम यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे आपसूकच घडून येईल, असे मनसुबे आखले गेले मात्र वंचित आघाडी मतदारसंघात किती मुसंडी मारणार यावरही बरेचकाही अवलंबून असणार आहे.घोलप यांच्यासमोर उभे राहण्याचा चंग बांधलेल्या सरोज अहिरे यांनी युतीच्या घोषणेनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादीकडून उमेदवारी मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. अहिरे यांची उमेदवारी देवळालीतील समीकरण बदलवणारी ठरू शकते. अर्थात घोलप यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका त्यांच्यात रुजविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.बहुतांश ग्रामीण भाग या मतदारसंघाला जोडला असल्यामुळे त्या किती लोकांपर्यंत पोहोचू शकतात हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणारा आहे. लक्ष्मण मंडाले यांना राष्टÑवादीची उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी केलेल्या तयारीमुळे मनसेकडून रिंगणात असलेल्या त्यांच्या मुलाच्या पारड्यात पडणारे मतदानही राष्टÑवादीचे समीकरण बिघडवू शकतात.बहुतांश ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात अन्य उमेदवारांची दमछाक होऊ शकते. अर्थात मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणारी आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देनासाका आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रलंबिंत प्रश्न.४बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यास अपयश.४ग्रामीण भागाला तीस वर्षांपासून शाश्वत विकासाची प्रतीक्षा.४पर्यटन, शिक्षण आणि उद्योग प्रकल्प नाही.४व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा मुद्दा.मतविभागणी होण्याची शक्यता कमीचदेवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. यंदा केवळ चारच अपक्ष आहेत तर वंचितच्या प्रभावाची चर्चा नसल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.४घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे पक्ष आलटून-पालटून उभे राहिले, त्याचा लाभ घोलप यांनाच होत गेला. अनुसूचित जातीसाठी राखीव असा हा मतदारसंघ असताना समाजाच्या राजकारणामुळे अन्य उमेदवारांना अपेक्षित मते मिळत नाहीत. यंदा सरोज अहिरे-घोलप यांची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता आहे.बदललेली समीकरणेसर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा या मतदारसंघाचा प्रवास आहे. १९७४ पर्यंत नाशिक-देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले.या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रूपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले.१९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपाचे भिकचंद दोंदे यांनी प्रथमच कमळ फुलविले आहे. १९९० मध्ये युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019devlali-acदेवळालीYogesh Gholapयोगेश घोलप