नाशिक : द्राक्षाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर सध्या हवामान बदलामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकविताणाच उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेण्याची गरज निर्माण झाली आहे. वायु प्रदुषणामुळे वातावरणात होणारे अनपेक्षित बदल द्राक्षांसह अन्य शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास कारमीभूत ठरत असून जागतिक तपमानात सातत्याने होणारी वाढ या हवामानातील बदलाला कारणीभूत ठरत असल्याने शेतकऱ्यांसमोरही आता ग्लोबल वार्मिंगचे आव्हान उभे ठाकले आहे. बदलत्या हवामानाचा आणि जागतिक तापमानात झालेली वाढ (ग्लोबल वार्मिंग) याची चाहूल महाराष्ट्राला १९७२ च्या दुष्काळापासून लागली असून १९७२ च्या दुष्काळानंतर पावसाने मृगाच्या ७ जूनला होणारा शिडकाव व पेरणीची न चुकणारी तारीख या ठरलेल्या शेतकऱ्याच्या आनंदाच्या क्षणाला तडा जावू लागला आहे. मृगाची ७ जूनला सुरुवात म्हणजे शेतकऱ्यांतील चैतन्य, कृषी क्षेत्रातील व्यापारउदीमतेतील उत्साह, ग्रामीण स्त्रियांची बी भरण्याची लगबग व साफसफाई करण्याची मुहूर्तमेढ ठरत असे. जस-जसे कोरडवाहू क्षेत्रातील मान्सून पावसावरील अवलंबन कमी होऊ लागले तसे तसे साधारण १९८५ ते १९९५ च्या दशकात द्राक्ष बागा, डाळींब फळबाग लागवडीमध्ये वाढ झाली.
हवामान बदलाचे शेती व्यवसायासमोर आव्हान
By admin | Published: March 22, 2017 3:39 PM