गुगुळवाड विकास आघाडीतर्फे वॉर्ड क्रमांक १ मधून सर्वसाधारण पुरुष गटात राजेंद्र दौलत निकम, अनुसूचित जाती-जमाती स्त्री राखीव गटात सुपाबाई रमेश तलवारे, वॉर्ड क्रमांक २ मधून सर्वसाधारण पुरुष गटात विश्वास नामदेव निकम, सर्वसाधारण स्त्री गटात कलाबाई विश्वनाथ निकम, वॉर्ड क्र. ३ नागरिकांच्या मागास प्रवर्गात सुनील यशवंत निकम, सर्वसाधारण स्त्री गटात नीलम सतीश महाले उमेदवारी करीत आहेत.
इन्फो
असा आहे वचननामा
गुगुळवाड विकास आघाडीतर्फे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वचननामा जाहीर करण्यात आला असून, यात मेळवण धरण (कान्होळी नदीवर) बांधकाम मार्गी लावणे. शिवारातील रस्त्यांचे काम करणे. गावठाण विस्तारीकरण कायद्यांतर्गत गावठाणचा विस्तार करणे. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे. गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे. सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे. प्रत्येक चौकात हायमास्ट लावणे. आदिवासींसाठी नवीन रस्ता, पूल, पाण्याची टाकी बांधणे. आदिवासी वस्तीत समाजमंदिराचे बांधकाम करणे, जंगल रस्त्यांचे काम करणे, गाऱ्या माथा वस्तीवर सौर दिवे लावून वस्तीशाळा सुरू करणे. जुनी पाण्याची टाकी काढून नवीन बांधणे. घरकूल योजनेंतर्गत प्रत्येकाला घरकूल देणे. रेशनकार्ड, संजय गांधी निराधार याेजना, श्रावणबाळ योजना या लाभार्थ्यांना मोफत लाभ मिळवून देणे. स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, वृक्षारोपण करणे, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हाळ बांधणे. धोबीघाट बांधणे. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार व पाटोदेच्या धर्तीवर विकासासाठी प्रयत्न करणे. तरुणांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे. मराठी शाळेचा दर्जा सुधारून डिजिटल शाळा करणे अशी आश्वासने देण्यात आली आहेत.
इन्फो
पाच वर्षांत तीन सरपंच
ग्रामपंचायतीत सीमा राजेंद्र निकम यांनी २०१५ पर्यंत सरपंच म्हणून काम पाहिले असून, २०१५ ते २०२० या काळात ३ सरपंच बदलले गेले. २०१७ मध्ये वाराबाई राजेंद्र निकम हे अपात्र ठरल्याने त्यांच्या जागेवर उत्तम खंडू माळी यांनी काम पाहिले. त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी लव्हा वामन माळी यांची सरपंचपदी निवड झाली.
पॅनल प्रमुख फोटो
फोटो फाईल नेम : ०६ एमजेएएन ०३ . जेपीजी - प्रा. आर. डी. निकम.
===Photopath===
060121\06nsk_12_06012021_13.jpg
===Caption===
प्रा. आर. डी. निकम