लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइन अशा संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत.कोरोनामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास तयार नव्हते. परंतु यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि केंद्र सरकारने विद्यापीठांना केलेल्या सूचनांमुळे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह देशभरातून विविध याचिका त्याविरोधात दाखल झाल्या. मात्र, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्य सरकार विद्यार्थ्यांना थेट उत्तीर्ण करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. परीक्षेशिवाय विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकत नाही.परीक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र परीक्षा रद्द होऊ शकत नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला परीक्षा घेणे बंधनकारक असल्याने तशी राज्य सरकरची तयारी सुरू असून, आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थी या निर्णयाने संभ्रमात पडला असून, परीक्षा आता आॅनलाइन की आॅफलाइन होणार? परीक्षेकरिता परीक्षा केंद्रावर जावे लागेल की मोबाइलच्या साहाय्याने परीक्षा होतील? परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल की कमी केला जाईल आदी प्रश्न ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे उपस्थित झाले आहेत.
अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 8:55 PM
लोकमत न्यूज नेटवर्क देवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइन अशा संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत.
ठळक मुद्देसंभ्रम : परीक्षा आॅनलाइन की आॅफलाइन होणार याकडे लक्ष