नाशिक : चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आनंद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी जल्लोष केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या जाणाºयाला वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.नाशिकमध्ये गेल्या गेल्या २१ वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागांतील आणि नाशिक महानगरातील सुमारे हजारो लोकांनी मडबाथचा आनंद लुटला.सकाळी ६ वाजेपासून येथे मडबाथला सुरुवात झाल्यानंतर बघता बघता येथे आलेल्या लोकांनी स्वत:च्या अंगाला चिखल फासून एक तास उन्हात चिखल वाळल्यानंतर मडबाथचा आनंद लुटला. महेश शहा, चिराग शहा तसेच योग गुरू नंदू देसाई यांनी यांच्यातर्फे या मडबाथचे आयोजन करण्यात आले होते.शरीरातील उष्णता जातेहनुमान जयंतीनंतर येणाºया पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी केली जाते. वारुळाची माती गोळा करून आठ दिवस आधी ही माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ही माती लावून अंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते.
चामरलेण्याच्या पायथ्याशी रंगला ‘मडबाथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:52 AM