नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यास विरोध करणाऱ्या कार्चोलीच्या ग्रामस्थांनी आता पुण्याच्या हरीत न्यायाधिकरणाकडे दाद मागितली आहे. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीचा स्लॅब हटविण्यासंदर्भातील सुनावणीच्या दरम्यान त्यांनी दाखल केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. दरम्यान स्लॅबमुळे गोदावरीस निर्माण झालेल्या अडथळ्यांविषयी याचिकाकर्त्यांनी बाजू मांडली. पुढिल सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीतील प्रदुषणासंदर्भात पुण्याच्या हरीत न्यायाधिकरणात ललीता शिंदे, राजेश पंडीत, निशीकांत पगारे यांनी दाखल केलेल्या याचिकेदरम्यान त्र्यंबकेश्वरचा पुजा विधीनंतर उरलेले साहित्य आणि अन्य कचरा याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने कार्चाेली शिवारात कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याच्या प्रलंबीत प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर काचोर्लीच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता. यापूर्वी येथील नागरीकांनी विरोध करताना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. प्रदुषण नियंत्रण मंडळाने याप्रकल्पास परवानगी दिल्यानंतरच पुढिल म्हणणे ऐकता येईल असे न्यायालयचे म्हणणे होते. परंतु आता मंडळाने प्रकल्पास मान्यता दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी गुरूवारी हरीत न्यायालयात दाद मागितली. दरम्यान, गोदावरी नदीवरील स्लॅब संदर्भातील अंतिम सुनावणीला प्रारंभ झाला आहे. न्यायाधिकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना कुशावर्ताचे ओव्हर फ्लो म्हणजे गोदावरी नदीच असल्याचा दावा करण्यात आला. गोदावरी नदीत गटार आणि नदीचे पाणी मात्र पाईपलाईनमध्ये बंद असा अजब प्रकार घडल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. २२ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
काचोर्लीच्या ग्रामस्थांची न्यायालयात धाव हरित न्यायाधिकरण: स्लॅब प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू
By admin | Published: December 12, 2014 1:39 AM