नाशिक : पाणथळ जागांचे आंतरराष्टÑीय स्तरावर संवर्धन करणाºया ‘रामसर’ संस्थेच्या यादीत आता महाराष्टÑही झळकणार आहे. नाशिकचे नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व बुलडाण्याचे लोणार सरोवर ही दोन स्थळे आंतरराष्टÑीय दर्जाची असल्याचे राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्तावामार्फत सूचित केले आहे.पाणथळ जागी होणारे जैवविविधतेचे संवर्धन आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने आंतरराष्टÑीय पातळीवर त्याची दखल घेतली जावी, यासाठी रामसर ही जागतिक पातळीवरील संस्था प्रयत्नशील आहे. भारतातील एकूण २६ पाणथळ जागांचा रामसरमध्ये समावेश आहे. त्यामध्ये अजून महाराष्टÑातील एकाही स्थळाचा समावेश झालेला नाही.महाराष्टÑातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने हे राष्ट्रीय दर्जाचे पक्षी अभयारण्य आंतरराष्टÑीय स्तरावरदेखील मान्यता मिळवू शक ते, असा विश्वास सर्वप्रथम वनविभागाला (वन्यजीव) वाटला. वनविभागामार्फत राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला.काय आहे ‘रामसर’च्इराणमधील रामसर शहरात १९७१ साली जागतिक स्तरावर पाणथळ जागा संवर्धनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्यात भारतासह १७०हून अधिक देशांनी सहभाग नोेंदविला होता. पाणथळ जागांचे संवर्धन नैसर्गिक अन्नसाखळी व जल परिसंस्थांची अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यादृष्टीने या परिषदेत मंथन घडले होते.च्जगभरात एकूण दोन हजार ३०१ पाणथळ जागांचा रामसरमध्ये समावेश आहे.च्१९७४मध्ये आॅस्ट्रेलियातील पहिली रामसर पाणथळ जागा घोषित करण्यात आली होती. रामसर संस्थेचे स्वित्झर्लंड येथे सचिवालय आहे.रामसर यादीतील राज्य (कंसात पाणथळ जागांची संख्या)केरळ (०३ )ओरिसा (०२)हिमाचल प्रदेश (०३)आसाम (०१)पश्चिम बंगाल (०२)पंजाब (०३)जम्मू-काश्मीर (०४),राजस्थान (०२)(आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश- प्रत्येकी ०१)नांदुरमधमेश्वरला ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्राचे भरतपूर म्हटले होते तसेच राष्टÑीय पक्षी अभयारण्याचा दर्जाही या पाणथळ जागेला प्राप्त झाला आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पक्ष्यांचे संमेलन येथे भरते. महाराष्टÑाच्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून लोणार ओळखले जाते. रामसर सचिवालयाकडून कोणत्या पाणथळ जागेवर शिक्कामोर्तब होईल, याची उत्सुकता आहे.नांदुरमधमेश्वर व लोणार या दोन पाणथळ जागांचा प्रस्ताव राज्य शासनाकडून रामसर पाणथळ जागेच्या मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. वर्षभरात केंद्राकडून तो रामसर सचिवालयाकडे पाठविला जाईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्टÑातील एकाही पाणथळ जागेला रामसर दर्जाचा बहुमान मिळालेला नाही.- एन. आर. प्रवीण, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नाशिक
‘रामसर’च्या पाणथळ जागांच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता; नांदुरमधमेश्वर, लोणार सरोवर स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:58 AM