शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चंदनाची उटी कुंकुमकेशरा : नाशिकच्या सिध्दीविनायकाला चंदनाचा लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:15 IST

चंदन उटी लेप करण्यासाठी भाविकांनाही ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही भाविकांनी चंदन पावडर मंदिरात दान केली तर उर्वरिच चंदन पावडर ट्रस्टमार्फत आणण्यात आली.

ठळक मुद्देवाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मुर्तीचे संरक्षण चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा

नाशिक : ‘रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा, हिरेजडीत मुकुट शोभतो बरा, रु णझुणती नुपुरे चरणी घागरिया...’ या ओळी श्रींच्या आरतीमधील असून वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे या उद्देशाने चंदनाच्या उटीचा लेप हा नाशिकमधील रविवार कारंजा येथील सिध्दीविनायक गणपती मुर्तीला (चांदीचा गणपती) लावण्यात येऊन सोमवारी (दि.२१) मंदिरात चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला.एकेकाळी उन्हाळ्यातही थंड वाटणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तपमान यंदा मात्र प्रचंड वाढत असल्याने उन्हाची दाहकता शहरात अनुभवयास येत आहे. वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही रविवार कारंजा येथील सिध्दीविनायकाला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. दरम्यान, चंदन उटी लेप करण्यासाठी भाविकांनाही ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही भाविकांनी चंदन पावडर मंदिरात दान केली तर उर्वरिच चंदन पावडर ट्रस्टमार्फत आणण्यात आली. या चंदन उटीचा लेप संपूर्ण मुर्तीला करण्यात आल्याने मुर्तीचे रुप पालटले आहे. यासाठी अकरा किलो चंदनचा वापर करण्यात आला आहे. चंदन उटी प्रसादाचे वाटप शुक्रवारी (दि.२५) भाविकांना करण्यात येणार आहे. तसेच चंदन उटीसह बाप्पाच्या मुर्तीभोवती मोग-याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. चंदन आणि मोगºयाचा गुणधर्म शीतल असल्यामुळे उन्हाची दाहकता कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे चंदन उटीचा लेप पंढरपूरच्या विठुमाऊलीला तसेच त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथांच्या मुर्तीलाही लावला जातो. शहरातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या संस्थेचे शंभरावे वर्ष असल्याने मंदिरामध्ये विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

http://www.lokmat.com/videos/nashik/nashik-siddhi-vinayak-news-video/

‘जैसे देही तैसे देवे’ या उक्तीनुसार जसा देहाला त्रास होतो तसा देवालाही होतो. त्यामुळे शहरातील वाढत्या उन्हाच्या दाहकतेपासून बाप्पांच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे मुर्तीला चंदन उटीचा लेप करण्यात आला. हे या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. पाच दिवसानंतर या चंदन उटीचा प्रसाद भाविकांना वाटप केला जाईल.-योगेश कुलकर्णी, मंदिराचे पुजारी

टॅग्स :Sidhivinayak Devsthanसिद्धीविनायक देवस्थानNashikनाशिकTempleमंदिरHeat Strokeउष्माघात