चांदगाव येथील कोरडीठाक पडलेली विहीर.येवला : तालुक्यातील चांदगाव येथे विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलाची भटंकती सुरू झाली आहे.चांदगाव येथे दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभपासून पाणीसाठ्यांमध्ये घट होऊन पाणीटंचाई जाणवू लागते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर होत असतो, मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेली ही स्थिती आजही बदललेली नाही. गावांमध्ये शाश्वत पाणी योजना राबवण्याची मागणी केली जाते;परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही.भारत निर्माणसारख्या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. गावात दरवर्षी १४ वित्त आयोगातील निधी पाणीपुरवठ्यावर खर्च होतो. मात्र, पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहातो. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डोंगर पायथ्याशी गाव असल्याने जादा पाऊस होत असला तरी परिसरात कुठलेही मोठे धरण वा साठवण सुविधा नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी परिसरातील वाहणाऱ्या नद्या, नाले आठ महिने कोरडेठाक असतात.
चांदगावला महिलांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:57 PM