चांदवड : येथील स्व. डी.एम. भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक महोत्सव व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन नगरसेवक जगन्नाथ राऊत, रेणुका महिला पतसंस्थेच्या संचालक रिंकू कासलीवाल, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन अहेर, शिक्षण विस्तार अधिकारी सोनवणे, समन्वयक वर्धमान लुंकड, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर, प्राचार्य सौ. व्ही.डी. मारणे, उपप्राचार्य टी. ए. वैद्य, पर्यवेक्षक एस. बी. बिनायक्या आदि उपस्थित होते. क्रीडा महोत्सवात पथसंचालन करण्यात आले यात चार हाउसचे ( ग्रीन, रेड, यल्लो, ब्ल्यु ) विद्यार्थी सहभागी झाले होते. पथसंचालनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले. त्यात उत्कृष्ट पथक म्हणून यल्लो हाउसची निवड करण्यात आली. कॉक हाउस म्हणून ग्रीन हाउसने विजेत्याचा मान मिळविला. यावेळी टग आॅफ वार, बास्केट बॉल, रिले शर्यत, लिंबू-चमचा, अडथळा शर्यत, सॅक शर्यत, कलेक्टिंग द बॉल, लंगडी, क्रॉस कण्ट्री आदि क्रीडा प्रकार घेण्यात आले. क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्याबरोबर पालकासाठीही चित्रे जोडणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनाही बक्षिसे देण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली. क्रीडा विभागप्रमुख समीर वैद्य, कोतकर, गलांडे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. प्राचार्य व्ही.डी. मारणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन आर.आर. कदम व एन. बी. ठाकरे यांनी केले. (वार्ताहर)
चांदवडला भन्साळी इंग्लिश मीडियमचा क्रीडामहोत्सव
By admin | Published: January 02, 2016 10:53 PM