पिळकोस : गिरणा नदीकाठच्या कसाड मळा शिवारातील साहेबराव माधवराव आहेर यांच्या शेतातून चंदन तस्करांनी बुधवारी (दि. ४) रात्री चंदनाचे झाड बुडापासून तोडले. मात्र त्यात गाभा मिळून न आल्याने कापलेले झाड त्याच ठिकाणी सोडून चोर पसार झाले. सकाळी आहेर यांचा मुलगा गणेश शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेला असता सदर बाब लक्षात आली. या प्रकाराने शेतकाऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. पिळकोस परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून चंदन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, मोठ्या प्रमाणात चंदनाच्या झाडांची तस्करी केली जात असून, वनविभाग व पोलीस प्रशासन याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालत नसून गस्त घालत नसल्याचे बोलले जात आहे. चंदन तस्करांचा संबंधितांनी तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सुनील जाधव, गणेश आहेर, राहुल आहेर, कौतिक मोरे, बुधा जाधव, सुरेश जाधव, प्रवीण जाधव, केवळ वाघ, निवृत्ती जाधव, सचिन वाघ, राहुल सूर्यवंशी, दादाजी जाधव, राहुल जाधव, भाऊसाहेब बर्वे, रवींद्र वाघ, बाजीराव जाधव, देवीदास गांगुर्डे, डोंगर पवार यांसह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. परिसरात चंदन चोर सक्रिय असून, चंदनाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत पोलीस व वनविभाग लक्ष घालत नसल्याने परिसरातून चंदनाच्या झाडाचे अस्तित्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चंदन तस्करांवर आजवर कारवाई झाली नसल्यामुळे परिसरात चंदनाच्या झाडाची सतत तोड केली जात आहे.
गिरणा नदीकाठच्या कसाड मळा शिवारातील पिळकोस परिसरात चंदनाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:09 AM
पिळकोस : गिरणा नदीकाठच्या कसाड मळा शिवारातील साहेबराव माधवराव आहेर यांच्या शेतातून चंदन तस्करांनी बुधवारी (दि. ४) रात्री चंदनाचे झाड बुडापासून तोडले.
ठळक मुद्देया प्रकाराने शेतकाऱ्यांत संताप व्यक्त गस्त घालत नसल्याचे बोलले जात आहे