चांदोरी : एकाच आठवड्यात पुन्हा चांदोरीसह परिसराला बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे.पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन फुलोऱ्यावर आलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. पावसाचा वेग जास्त असल्याने शेतामध्ये पाणी साचले. यामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. चांदोरी परिसरात दाखल झालेल्या ऊस मजुरांचे व द्राक्षबाग कामासाठी आलेल्या मजुरांचे अतोनात हाल झाले. तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या झोपड्यांचे वादळामुळे नुकसान होऊन त्यांच्या राहण्याची गैरसोय झाली आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कमी झालेल्या पर्जन्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्षबागांचे पुन्हा एकदा प्रचंड असे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात दोनदा झालेल्या पावसामुळे द्राक्षासह रब्बी पिकांवर औषध फवारणी करावी लागणार आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने औषध फवारणीसाठी अडचणी वाढणार आहे. - विक्र म टर्ले, द्राक्ष बागायतदार, चांदोरी
चांदोरी परिसराला पुन्हा पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:05 AM