योेगेश सगर कसबे सुकेणेगुरु वार, वेळ : सकाळी ११ वाजता, स्थळ : चांदोरी : रस्त्यांवर असलेला गाळ तुडवीत प्रशासन आणि स्थानिकांचे सुरू असलेले मदतकार्य.. कुठे सामाजिक दातृत्वातून होणारे अन्नदान, तर कुठे वाहून गेलेल्या दुकानांचे अवशेष शोधणाऱ्या नजरा.. रोजी-रोटीच्या अपेक्षेने दुकानातला पुराचा गाळ काढणारे शेकडो हात.. आणि त्याच गुडघ्याएवढ्या पाण्यात तोल सांभाळत संसाराला सावरणाऱ्या महिला.. तर महापुराचा सामना करीत नव्या जोमाने उभे राहिलेले चांदोरीकर पाहिल्यानंतर... भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले.. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.. या कुसुमाग्रजांंच्या कवितेतील ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. महापुरातून सावरणाऱ्या चांदोरी-सायखेड्यातील गुरु वारचे हे चित्र मनाला सुन्न करणारे होते.
चांदोरी, सायखेडा अजूनही सुन्नच...
By admin | Published: August 05, 2016 12:57 AM