नाशिक : राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार व गैरकारभार यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व महसूल व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमण्याची घोषणा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक भेटीत केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून, महसुल अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नाव गुप्त ठेवत पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून एक प्रकारे आरोपीच्या पिंज-यातच उभे केले आहे.सध्या सोशल मिडीयावर गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातील पोस्ट फिरत असून, त्यात जर खरोखर महसूल खात्यात गुप्तहेर नेमले तर महसूल खत्यातील भ्रष्टाचार व गैर कारभार याला नक्कीच आळा बसेल यात तिळमात्र शंका नाही असे प्रारभंीच नमूद करून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात राज्यात महसूल विभागच काय तर प्रत्येक शासकीय कार्यालयात नजर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते ‘अनुलोम’ या संस्थेच्या माध्यमातून अगोदरच नेमण्यात आले आहेत,हे आपणांस माहित नाही काय? आपल्या महसूल विभागात ७५% अधिकाºयांना साधे वाहन सुद्धा नाही, तसेच वाहनचालक नाहीत, डिझेल व दुरुस्ती साठी पैसे नाहीत,याची आपल्याला माहिती आहे. महसूल विभागातील शेकडो अधिकारी व हजारो कर्मचारी यांची पदे गेल्या अनेक वषार्पासून रिक्त आहेत आणि त्याचा विपरीत असा परिणाम महसूल विभागाच्या शासकीय कामकाजावर होत आहे, त्यामुळे राज्य शासनाची प्रतिमा मलिन होत आहे. याची माहिती आपल्या अखत्यारीत येत असलेल्या महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव व मंत्रालयाच्या महसूल विभागातील झारीतील शुक्राचार्य असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपणांस अद्यापही दिली नाही काय? दिली नसल्यास त्याची माहिती आपण गुप्तहेर नेमुनच घेणार आहात काय? राज्यातील ठराविक अधिकाºयांनाच चांगल्या व मोक्याच्या पोस्टिंग का मिळतात त्याची सुद्धा माहिती आपण गुप्तहेर नेमुन घ्यावी म्हणजे सत्य बाहेर येईल असा टोलाही लगावण्यात आला आहे.महसूल विभागात सध्या उपजिल्हाधिकारी संवगार्ची जवळपास १२५ पदे रिक्त असून मंत्रालयातील नतद्रष्ट कार्यपद्धतीमुळे गेल्या पाच वर्षांपासून तहसिलदार या पदावर पदोनत्त्या होऊ शकल्या नाहीत,तहसिलदार व नायब तहसिलदार या संवगार्ची सुद्धा शेकडो पदे राज्यात रिक्त आहेत, याची सुद्धा माहिती आपण गुप्तहेर नेमुन घ्यावी त्याच बरोबर राज्यात अलीकडील काळात झालेल्या पोस्टिंग,बदल्या व पदोनत्त्या या मध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही,अशी आमची धारणा आहे, याबाबत चौकशीसाठी आपण गुप्तहेर नेमणार काय ? राज्यातील शेकडो पोलिस अधिकारी व हजारो पोलिस कर्मचारी काहीही कारण नसताना नदी व वाळू पट्यात नेमके काय करतात त्याचीही माहिती आपण या गुप्तहेर लोकांकडुन घेणार आहात काय? तहसीलदार यांचेकडून सर्व कामे करून घेतांना त्यांना तालुका प्रमुख करा ही मागणी आहे, याबाबत काय निर्णय घ्यावे, याचीही माहिती गुप्तहेरा मार्फत घेणार का? तहसीलदार यांचे वेतन वाढवण्यासाठी कित्येक दिवसाची मागणी आहे, याबाबत निर्णय घेण्यासाठी गुप्तहेर नेमलेत का? अनेक ठिकाणी महसुली अधिकारी यांच्यावर हल्ले झाले त्यांना साधं संरक्षण देता आले नाही याची माहिती वर्तमान पत्रातून झळकली त्याची दखल घेण्यासाठी गप्तहेर नेमले काय असा सवाल करून महसूलमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
गुप्तहेर नेमण्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:04 PM
सध्या सोशल मिडीयावर गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातील पोस्ट फिरत असून, त्यात जर खरोखर महसूल खात्यात गुप्तहेर नेमले तर महसूल खत्यातील भ्रष्टाचार व गैर कारभार याला नक्कीच आळा बसेल यात तिळमात्र शंका नाही असे प्रारभंीच नमूद करून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत
ठळक मुद्देमहसूल अधिकारी आक्रमक : मंत्रालयातील भ्रष्टाचाराचीही माहिती घ्या संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते ‘अनुलोम’ या संस्थेच्या माध्यमातून अगोदरच नेमण्यात आले आहेत