उमराणे : येथे व परिसरात गेल्या काही दिवसापासुन भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असुन गावातील छोट्या मोठ्या दुकानांतील चोरींबरोबरच आता या भुरट्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनांच्या झाडांवर डल्ला मारण्यास सुरु वात केली आहे. येथील शेतकरी भगवान पुंडलिक देवरे यांच्या शेतातील चंदनाचे झाडे या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तोडुन नेले आहे. व्यापारपेठ असलेल्या उमराणे गावात छोट्या मोठ्या चोºया होणे ही नविन बाब नसुन येथे शेळ्या-मेंढ्या, विहीरीतले विद्युतपंप, मोटारसायकली, दुकाने फोडणे, मोबाईल आदी छोट्या मोठ्या चोºया होतच राहतात. याशिवाय अन्य ठिकाणी चोरी न करता आल्यास शेतकऱ्यांच्या बांधावरील किंमती चंदनांचे झाडे तोडून विक्र ी करण्यात भुरटे चोरं पटाईत झाले आहे. या परिसरात वारंवार चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याने चंदन तस्कर टोळी सक्र ीय असल्याचे स्पष्ट होते. यापुर्वीही या परिसरातील अनेक शेतकरींचे चंदनाचे झाडे तोडुन चोरीस गेली असुन तक्र ारी करु नही चंदन चोरांना पकडण्यात यश येत नसल्याने चोरींचे प्रमाण वाढले आहे. सदर भुरट्या चोरांवर आळा बसविण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थाकडुन करण्यात येत आहे. दरम्यान १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या उमराणे गावासह परिसराच्या सुरक्षेसाठी देवळा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी देण्यात आली आहे. या पोलीस चौकीत अवघ्या तीन ते चार पोलीस शिपार्इंची नेमणूक करण्यात आली असुन गाव व परिसराची लोकसंख्या बघता पोलीस यंत्रणा अत्यंत तोडकी असल्याने व त्यांचाही वचक नसल्याने अवैध धंदे, छोट्या मोठ्या चोर्या नेहमी होत असतात.त्यामुळे नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असुन पोलीसांचा धाक नसल्याने अवैध व्यवसायांसह भुरट्या चोरांचे फावले आहे.
उमराणेत चंदनचोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:14 PM