सिन्नर : सततच्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सरसावलेल्या तालुक्यातील चंद्रपूर-खपराळे येथील महिलांनी पाणी फाऊंडेशनच्या मदतीने १५ शोषखड्डे आणि सहा परसबागा फुलविल्या आहे. दिवसभर वेगवेगळ्या कामांत व्यस्त असणारे ग्रामस्थ सायंकाळच्या वेळी एकत्र येवून सामूहिक पध्दतीने शोषखड्डे करून भविष्यात पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.पानी फाउंडेशनतर्फे या गावातील १३ महिला आणि दोन पुरूषांनी पानी फाउंडेशनचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करून गावात प्रत्यक्ष जलयुक्त शिवाराच्या कामांना सुरूवात केली आहे. बारमाही दुष्काळी असलेल्या चंद्रपूर-खपराळे येथील रूख्मिणी शेखरे, सुरेखा भांगरे, दीपाली तळपे, सुनीता मदने, अलका बुळे, अलका घोडे, सुनीता घोडे, फशाबाई घोडे,. अरूणा घोडे, शुभांगी तळपे, कल्पना साळवे या महिलांनी पुढाकार घेत गाव परिसरात सहा परसबागा तयार केल्या आहेत.पानी फाउंडेशनच्या तालुका समन्वयक सुषमा मानकर यांनी गावात जाऊन पाणी बचतीचे महत्व सांगत येथील ग्रामस्थांना पाणी फाउंडेशनच्या मदतीने गावातील दुष्काळ हटविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
चंद्रपूर- खापराळेत येथे शोषखड्यांसह फुलविल्या परसबागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 5:36 PM