चांदवड : अधिकमासानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व संगीत भागवत कथा भागवताचार्य केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांच्या मार्गदर्शनाने दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय राऊत यांनी दिली. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता बुधवार, दि. ३० मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नीलेश महाराज निकम (नांदगाव) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होईल. यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील संत-महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, वादक उपस्थित राहणार असल्याची माहिती संत गजानन महाराज भक्त मंडळाने दिली.
चांदवडला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:48 AM