किरण सुभाष साळवे ( ३३ , रा . मनमाड) व रोहित घरटे (रा . कल्याण) अशी या संशयितांची नावे आहेत. कोरोना महामारी परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार उघडकीस आला. कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून रेमडेसिविर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेत या इंजेक्शनचा काळाबाजार वाढला आहे. गुरुवारी चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एक इसम घुटमळत असल्याचा संशय आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ रेमडेसिविरच्या नावाखाली काहीतरी द्रव्य भरलेल्या तीन बाटल्या आढळून आल्या. पोलिसांना पाचारण केल्यानंतर संबंधित इसमाने या बाटल्यांचे लेबल फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसेनेचे चांदवड शहरप्रमुख संदीप उगले यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील एकास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस हे पुढील तपास करीत आहेत .
बनावट रेमडेसिविरप्रकरणी चांदवडला एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:16 AM