कोविड रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली त्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश केला. विविध चाचण्या घरोघरी जाऊन करणे, सर्व्हे करणे, रेकॉर्ड ठेवणे, लसीकरण शिबिरामध्ये उपस्थित राहून कामे करणे, तसेच इतरही ७२ पेक्षा जास्त कामे आशा सेविका व गटप्रवर्तकांना दिली असून, सदर कामांचा ताण येत आहे. तर मार्च २०२१ पासून ग्रामीण व शहरी भागात आशा सेविकांची लसीकरण केंद्र व विलगीकरण कक्षात ड्यूटी लावली.
चांदवड येथील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत, अन्यथा सर्व आशा स्वयंसेविका आंदोलन छेडतील, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सुनीता गांगुर्डे, संगीता जाधव, सीमा बागुल, कावेरी वाळुंज, सुमन चव्हाण, शीला गोधडे, तमन्ना शेख, वंदना कोतवाल, सदफ सैयद, रूपाली आहेर, योगीता चव्हाण, वैशाली कापडणो, मनीषा कापडणे, परिधा ठाकरे, शोभा वाटपाडे, अंजली बनकर, अनिता बनकर आदींच्या सह्या आहेत.
--------------------------------------------------------------------------------
15 एम.एम.जी.3- विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांना देताना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक.
----------------------------------------------------
चांदवडला दिवसभरात आठ नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. १४ जून रोजी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह अहवालामध्ये भुत्याणे, जोपूळ, कानमंडाळे, पिंपळनारे, तांगडी, परसूल, तिसगाव, वाहेगावसाळ येथील रुग्णांचा समावेश आहे. एकूण १८९ अहवालांपैकी आठ अहवाल पॉझिटिव्ह, तर बाकीचे निगेटिव्ह आले आहेत.
------------------------------------------------------
चांदवडला एमबीएतर्फे ई -अस्तित्वचे आयोजन
चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातर्फे ‘ई-अस्तित्व २०२१’ या चारदिवसीय ऑनलाइन राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे दि. १६ ते १९ जूनदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन हिवरे बाजार या आदर्श गावचे सरपंच, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम गायत्री नर्सरी व उद्योगसमूह, उगाव, ता. निफाड तसेच महाराज युवा फाउंडेशन, कळवण यांचे सौजन्य लाभले असल्याची माहिती एमबीए विभागप्रमुख डॉ. अभय बोरा यांनी दिली. यात रांगोळी, गायन स्पर्धा, नाट्यस्पर्धा, नृत्य स्पर्धा, निबंधलेखन, प्रश्नमंजूषा, वन मिनिट शो, रिल्स कॉम्पिटिशन, फॅशन शो, पोस्टर प्रेझेंटेशन, एक्सटेंपोर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
===Photopath===
150621\15nsk_15_15062021_13.jpg
===Caption===
१५ एमएमजी ३