चांदवड - चांदवड येथील कुलस्वमिनी रेणुका देवीचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने अनेक भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घेतला तर यंदा प्रथमच नवरात्र उत्सवात परिसरात यात्राउत्सव नव्हता तर परिसर अगदी ुसुना -सुना होता. मात्र श्री. रेणुका देवी मंदिर ट्रस्टने आॅनलाईन दर्शनाची सोशल मिडीया,स्थानिक वाहीनीद्वारे व्यवस्था केल्याने हजारो भाविकांनी घरून श्री. रेणुका मातेचे दर्शन घेतले.
दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी पुरातन गावाबाहेरील खंडेराव मंदिरात श्री. रेणुका देवीची पालखी सोहळा रद्द केला. सिमोल्लंगासाठी गावाबाहेरील श्री. खंडेराव महाराज मंदिरात पालखी नेण्याची परपंरा खंडीत झाली मात्र रेणुका देवी संस्थानतर्फे सायंकाळी देवीचा मुखवटा, नैवैद्य खंडेराव मंदिरात सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, ज्ञानेश्वर भालेराव, संतोष देवरे व रेणुका देवी संस्थानचे पुजारी व सेवेकरी यांनी नेल्याने अखेर पालखी सोहळा जरी रद्द झाल असला तरी श्री. रेणुका देवी व खंडेराव महाराज यांच्या भेटीचा सोहळा पार पडल्याने भाविकांनी समाधान मानले.
तर अष्टमीला अजय शेटे यांच्या हस्ते होमहवन झाले. व माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, निफाडचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ तांबे यांच्या हस्ते महाआरती झाली. यंदा कोरोनाचे पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कावडी सोहळा व कोजागिरी उत्सव रद्द झाल्याचे व्यवस्थापक एम.के.पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सांगीतले.