चांदवड : चांदवड शहरात व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयादशमी अर्थात दसरा सण निरुसाहात संपन्न झाला.त्यात सर्वच देवीचे मंदिरे बंद असल्याने दसऱ्यानिमित्त सर्वच बाजारपेठ शांत होती.
दसºया निमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ फुलली होती तर झेंडूचे भाव प्रारंभी वधारल्याने नागरीकांनी खरेदी करण्यास हात आखडता घेतला.सकाळी ८० रुपये ते १०० रुपये किलोने झेंडू फुलांची विक्री झाली तर यंदा कोरोनाचे संकट असल्याने झेंडू उत्पादकांनी जास्त झेंडूची लागवड केली नाही. दुपारनंतर झेंडू मातीमोल भावाने विकला गेला.आपटे (सोने) विक्री साठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
चांदवडच्या आठवडेबाजारात दसºयाच्या पार्श्वभूमीवर झेंडू व आपटे पाने विक्रीसाठी दुकाने थाटली होती. तर अनेक दुकानदारांनी व ग्राहकांनी सोशल डिस्टसींग न पाळता व मास्क न लावता गर्दी केली होती. चांदवड येथील श्री. रेणुका देवीचे मंदिर दहा दिवस बंद असल्याने सभोतालचा परिसर सुना सुना वाटत होता. तर गावातील अनेक देवीची मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद असली तरी प्रत्येक मंदिरात वार्षिक परपंरेनुसार अष्टमी, नवमी रोजी होमहवन , दुर्गापाठ , नवचंडी होम करण्यात आले तर चांदवड येथील श्री. दसा श्रीमाळी वैष्णव गुजराथी समाजाच्या गुजराथ गल्लीतील श्री. महालक्ष्मी मंदिरात होमहवन , आरती , प्रसाद आदि कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसींग पाळून करण्यात आले.
होमहवन नानासाहेब गुजराथी, अपेक्षा गुजराथी यांच्या हस्ते झाला. तर पोरोहित्य प्रदीप वैद्य, हरदास यांनी केले.यावेळी गुजराथी समाज महिला पुरुष उपस्थित होते.