मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका संपल्याने ही वेळ नगर परिषदेवर ओढावली आहे. दरम्यान सफाईचा ठेका एक वर्षासाठी होता. त्याची मुदत मे महिन्यात संपल्याने नवीन ठेका मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहे. त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत नवीन ठेकेदारांची मुदत वाढवून देता येत नाही, अशी बाब समोर येत आहे. तर चांदवड नगर परिषदेचे सफाई कामगार नगण्य असल्याने त्यांच्याकडून चांदवड शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता स्वच्छता होत नाही. ठेकेदाराकडे सुमारे पन्नास सफाई कर्मचारी कार्यरत होते. ठेका बंद झाल्यावर त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आल्याचे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात आम्ही जिवाची पर्वा न करता शहराची स्वच्छता केली. मात्र, नगर परिषदेने अडचणीच्या काळात आमच्यावर उपासमारीची वेळ आणल्याचे निवेदन त्यांनी नगर परिषदेला दिले. दरम्यान, लवकरात लवकर गावात ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
फोटो- १४ चांदवड गार्बेज
चांदवड शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग.
===Photopath===
140621\14nsk_22_14062021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ चांदवड गार्बेज चांदवड शहरात साचलेले कचऱ्याचे ढिग.