- महेश गुजराथीचांदवड (नाशिक)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत सात निकालामध्ये भाजपा शेतकरी विकास पॅनल तीन जागा तर महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन पॅनलला तीन जागा व अपक्ष उमेदवार असे सात जण विजयी झाले .
यात सोसायटी गट इमाव प्रवर्गातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी आमदार शिरिष कोतवाल 631 मते पडून विजयी सोसायटी गट भटक्या विमुक्त गटातून महाविकास आघाडीचे विक्रम मार्कंड 515 मते पडून विजयी . ग्रामपंचायत गटातून अनुजाती -जमाती प्रवर्गातून भाजपा शेतकरी विकास पॅनल चे वाल्मीक वानखेडे एकूण 392 मते पडून विजयी. ग्रामपंचायत अनुजाती जमाती गटातून महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन गटातून दयानंद महादू अहिरे यांना 379 मते पडून विजयी झाले . व्यापारी गटातून महाविकास आघाडीचे सचिन अग्रवाल 170 मते मिळवून विजयीव्यापारी गटातून भाजपा शेतकरी विकास पॅनलचे सुशिल पलोड 158 मते मिळवून विजयी. हमाल मापारी गटातून भाजपा शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार 75 मते मिळवून विजयी झाले .