चांदवड : तालुक्यात दि. २१ ऑक्टोबर रोजी २० व्यक्तींपैकी सात व्यक्तींचे कोराना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर दि. २२ ऑक्टोबर रोजी ४० व्यक्तींपैकी १६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात दोन दिवसांत २३ नवे बाधित आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बाधितांमध्ये भाटगाव येथील दोन, शेलू येथील एक, कळमदरे येथील चार असे सात रुग्ण, तर दि. २२ ऑक्टोबर रोजी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये धोडंबे येथील एक, वडाळीभोई येथील एक, सुतारखेडे येथील एक, चांदवडचे दोन, वाघदर्डीचे चार, तर खासगी लॅबनुसार सात रुग्णांमध्ये चांदवडचे दोन, वडाळीभोईचे तीन, इंद्रायवाडीचा एक, रायपूरचा एक अशा एकूण २३ जणांचा समावेश आहे. हे बाधित जुन्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली.
चांदवड तालुक्यात २३ रुग्ण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:49 PM