चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 06:20 PM2018-12-06T18:20:12+5:302018-12-06T18:20:47+5:30
चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन दिले
चांदवड - चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन दिले
यावेळी तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव,कार्याध्यक्ष समाधान जामदार, उत्तमराव ठोंबरे भीमराव जेजुरे,बापु शिंदे,नंदकुमार कोतवाल, खठडू सोमवंशी,बाळु खरे,विजय कुंभार्डे, अशोक जाधव, विश्वनाथ ठोके, दामु देवरे संपत चव्हाण, रमेश बस्ते,सुरेश कोतवाल ,संघरत्न संसारे,दादाजी गांगुर्डे,रामदास व्यवहारे,दीपक पगार,दत्तु पगार,राजेंद्र भुजार्डे आदिसह शेतकऱ्यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री , संबधीत मंत्री प्रांत सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भाजपा सरकारच्या काळात शेतकरी बांधवांच्या शेतीमालास उत्पादन आधारीत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. उन्हाळ कांद्याचे दर वाढतील या आशेने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा साठवणुक करु न ठेवलेला आहे. मात्र बाजारात लाल कांद्याची आवक सुरु झाल्याने उन्हाळ कांद्याचे बाजारभावात दैनंदिन घसरण होतांना बघावयास मिळत आहे. आज उन्हाळ कांद्यास रु .50 ते 500 ते सरासरी 350 बाजारभाव मिळत आहे.
चांदवड तालुक्यामध्ये यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असुन तालुक्यात नविन लाल कांद्याचे उत्पादनात घट निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतक-यांनी नविन लाल कांदा पिकविण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने, टँकर द्वारे, शेततळ्यातुन मोठ्या प्रमाणात खर्च करु न पिके घेतलेली आहे. मात्र बाजार पेठांमध्ये कांद्यास 500/- रु पयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने यातुन शेतक-यांचा उत्पादन खर्च ही निघणार नाही.शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावयाची नामुष्की ओढवल्यावर शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे बहुदा शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करु न शकल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त होतो.
शेतक-यांच्या कांदा शेतीमालास रु .2000/- हमीभाव देवून तात्काळ कांदा बाजार हस्तक्षेप योजना सुरु करावी, चांदवड तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने जनावरांचा पिण्याचा पाण्याचा व चा-याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा, विक्र ी केलेल्या लाल व उन्हाळ कांद्यासाठी अनुदान मिळावे, शाळकरी मुलांना मोफत पासची सुविधा उपलब्ध करु न द्यावी, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत पुर्ण झालेल्या शेततळ्यांच्या व अस्तरीकरणांचे कामांचे अनुदान त्वरीत वितरीत करावे. संपुर्ण चांदवड तालुका दुष्काळी जाहिर करावा असे निवेदनात म्हटले आहेत.