चांदवड : चंदनाची तस्करी करणाºया तिघांना वाहनासह ताब्यात घेण्यात नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चांदवड येथील सोमा टोल नाक्याजवळ यश आले आहे. या कारवाईत सुमारे सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रवीण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, कर्मचारी चेतन संवस्तर, विजय कोरडे, किरण गांगुर्डे, कुणाल मराठे, संपत अहिरे यांच्या पथकाला शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चंदन तस्करी करणारे तीन जण कारने जात असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. पोलिसांनी चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर सापळा रचत पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मालेगावकडून चंदन घेऊन जात असलेली कारची (एमएच ०२ सीएच ४५०१) तपासणी केली असता तिघांकडून चंदन, कारसह तर त्यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडल्यानंतर लगेच पोलीसांनी चंदन तस्करी पकडल्याने गुन्हेगाराचे चांगले धाबे दणाणले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारला अडवून त्यातील तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचे चंदन, तर सात लाख किमतीची स्कोडा कार ताब्यात घेतली, तर तात्या काळू पवार, निशांत मारोती पवार, राकेश मधुकर वाघ सर्व रा. मालेगाव यांना ताब्यात घेतले.
चांदवडला चंदन तस्करी तिघांना अटक : वाहनासह बारा लाखाचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:56 IST
चांदवड : चंदनाची तस्करी करणाºया तिघांना वाहनासह ताब्यात घेण्यात नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चांदवड येथील सोमा टोल नाक्याजवळ यश आले आहे.
चांदवडला चंदन तस्करी तिघांना अटक : वाहनासह बारा लाखाचा माल जप्त
ठळक मुद्देचांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल गुन्हेगाराचे चांगले धाबे दणाणले