चांदवड - श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पक्ष्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्र म घेण्यात आलेत.तसेच सकाळी आपल्याला अनेक पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकू येतो विविध पक्षी हे या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहेत .पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी या वाढत्या उन्हात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी ,दाणा पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी घरी व आजुबाजुच्या झाडांवर करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.संगीता बाफणा यांनी केले.वाढत्या शहरीकरण व झाडां झुडपांची संख्या कमी झाल्यामुळे पक्ष्यांच्या संख्येवर मोठा परीणाम झाला आहे.शहरातील केबल वायर ,मोबाईलमुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर व मानिसकतेवर परीणाम झाला असुन ही चिमण्या कमी होण्याची कारणे आहेत असे पक्षी संशोधकांचे मत आहे. उन्हाळ्याची चाहुल सुरु झाली आहे पाण्यासाठी पक्ष्यांची आर्त हाक सर्वांना ऐकायला मिळते यामुळे विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी दाणा पाणी निवारा घरटे तयार करण्याचे मार्गदर्शन विद्यालयाचे कलाशिक्षक के.व्ही.अहिरे यांनी केले. विविध अशा टाकावु वस्तू वापरु न इयत्ता ५वी ते ७ वी तील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतुन दाणा-पाण्यासाठी भांडी व घरटी बनविलीत व ती विद्यालय परीसरातील झाडांवर लावुन पक्षी संवर्धनाचा संकल्प केला.विद्यालयाच्या दर्शनी फलकावर चित्र रेखाटून कलाशिक्षक के.व्ही.अहिरे यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमणी संवर्धनाचा संदेश दिला.यावेळीर चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी.पी.गाळणकर ,डॉ.एस.आर.बाफणा यांच्या हस्ते करण्यात आले. या पक्षी चित्र प्रदर्शनात जवळपास दिडशेच्या वर पक्ष्यांची सचित्र माहिती विद्यार्थ्यांनी अनुभवली.त्यात दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांचा प्रदर्शनात समावेश होता .याप्रसंगी उपप्राचार्य एस.यु.समदडीया ,विभाग प्रमुख सी.डी.निकुंभ ,पर्यवेक्षक एम.टी.सोनी, आर.एम.पवार,आर.एस.पाटील ,एम.बी.सुराणा व विद्यार्थीं उपस्थित होते.
चांदवडला जागतिक चिमणी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 6:56 PM
चांदवड - श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पक्ष्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्र म घेण्यात आलेत.तसेच सकाळी आपल्याला अनेक पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकू येतो विविध पक्षी हे या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहेत .पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी या वाढत्या उन्हात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी ,दाणा पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी घरी व आजुबाजुच्या झाडांवर करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.संगीता बाफणा यांनी केले.
ठळक मुद्देदुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांचा प्रदर्शनात समावेश