चांदवड- चांदवड शहरातील वरचेगावात राहणारी अल्पवयीन मुलीची मुलाने छेड काढून शाळेत व क्लासचे रस्त्यावरुन तिचे पाठोपाठ मोटारसायकलने जाऊन वाईट विचार प्रकट केल्या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला त्या मुलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून चांदवड पोलीसांनी मुलास ताब्यात घेतले आहे तर त्याचे साथीदार व मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणी रविवारी रात्री शिवनेरी चौक परिसरात या घटनेची माहिती मिळाताच असंख्य तरुण जमा झाले त्यांनी चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना सदर घटनेची माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळी व मुलाच्या घरी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले या प्रकरणी सोमवारी चांदवड शहरातील रंगमहाल परिसरातुन सकाळी १० वाजता चांदवड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचे आवाहन सोशल मिडीयावरुन देण्यातही आले दरम्यान चांदवड शहरातील शिवसेना शहरप्रमुख चांदवड मर्चन्ट बॅकेचे अध्यक्ष जगन्नाथ राऊत, निवृत्ती व्यवहारे, शंभु खैरे, गुडडू खैरनार, राजकुमार संकलेचा, दीपक व्यवहारे, दत्तात्रय राऊत व असंख्य कार्यकर्त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटील यांनी कायद्याच्या पध्दतीने आम्ही काम करणार असून कोणीही कायदा हातात घेऊ नये अशा समाजकंटकाबाबत चांदवड पोलीसांना माहिती द्या मग तो कोणी असो त्याची गय केली जाणार नाही यासाठी पोलीसांना सहकार्य करा, त्यांचा बिमोड करणार असल्याचे आश्वासन दिल्याने संतप्त कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारातुन निघुन गेले याप्रकरणी काही काळ चांदवड शहरातील वातावरण तणावपुर्ण झाले होते पोलीस निरीक्षक संजय पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.
चांदवड शहरात अनेक १८ते २० वयोगटातील तरुण सुसाट वेगाने दुचाकी चालविणे, रस्त्यातच दुचाकी घेऊन गप्पा मारत उभे राहणे, ओट्यावर घोळक्याने रात्री उशीरापर्यंत बसणे, चांदवड येथील अनेक पुलावर अश्लील वर्तन करुन मुलीची छेड काढण्याचे प्रकार वाढत असून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली.