वाॅर्डनिहाय विजयी उमेदवारात वाॅर्ड क्र. १ मध्ये प्रतिभा बोराडे, वैशाली गांगुर्डे, वाॅर्ड क्र. २ मध्ये राजाराम पवार, नगिना कासलीवाल, पंचफुला दळवी, वाॅर्ड क्र. ३ मध्ये अल्केश कासलीवाल, शिवम अहिरे, सविता टिटवे, वाॅर्ड क्र. ४ मध्ये डॉ. प्रीतम वैद्य, सागर सोनवणे, शोभा जाधव यांचा समावेश आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गावात गुलाल उधळूण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. प्रारंभी, स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नवनिर्माण विकास पॅनलचे नेते अल्केश कासलीवाल यांनी गावविकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून, निवडणूक काळात दिलेल्या वचनांची पूर्ती केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी बाबूलाल कासलीवाल, त्र्यंबक बढे, शांताराम पवार, चंद्रभान व्यापारे, दत्तू सोनवणे, किरण बढे, बाळू बोराडे, अशोक बोराडे, मारुती वैद्य, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, तुषार अहिरे, बाळू चव्हाण, मेहबूब पठाण, राजू परदेशी, मुकेश परदेशी, अप्पा सोनवणे, भगवान जाधव, सागर परदेशी, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.
इन्फो...
अनकाई ग्रामपंचायतीत नगिना कासलीवाल व अल्केश कासलीवाल हे माय-लेक विजयी झाले आहेत. माय-लेक विजयी होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
===Photopath===
210121\21nsk_38_21012021_13.jpg
===Caption===
अनकाई ग्रामपंचायतीत बहुमत प्राप्त केल्यानंतर जल्लोष करताना नवनिर्माण पॅनलचे विजयी उमेदवार.