शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
2
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
3
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
4
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
5
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!
6
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, ६ दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
7
"८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग
8
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
9
Video: कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गर्लफ्रेंडला अंगठी घालून केलं प्रपोज, श्रेया घोषाल म्हणाली- "मंत्र पण वाचायचे का?"
10
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
11
Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी
12
Devayani Farande : फरांदे समर्थकांचे फडणवीसांना साकडे; माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
13
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण
14
Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट
15
अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन
16
Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
17
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
18
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
20
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदला

By admin | Published: November 22, 2015 11:05 PM

शाहू खैरे : जुन्या नाशकात विस्कळीत पुरवठ्याने गैरसोय

नाशिक : महापालिकेने पाणीकपात सुरू केल्यानंतर त्याचा जुन्या नाशिकमधील उंच-सखल भागाला सर्वाधिक फटका बसत असून, सकाळच्या वेळी अतिशय कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन तारांबळ उडत आहे. सदर विस्कळीत वेळापत्रक बदलून काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा करण्याची सूचना कॉँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी पाणीपुरवठा विभागाला केली आहे.महापालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात पाणीकपात सुरू केली असून, त्यादृष्टीने वेळापत्रकही तयार केले आहे. वेळापत्रकानुसार सकाळ, दुपार, सायंकाळी आणि रात्री उशिरा अशा चार सत्रात विभागनिहाय पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु या पाणीकपातीचा सर्वाधिक फटका जुन्या नाशिकला बसत आहे. जुने नाशिकमधील बराचसा भाग हा उंचावर असल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत असतात. सध्या जुने नाशिक परिसरात सकाळी एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु अतिशय कमी वेळात कमी दाबाने होणाऱ्या या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोयच होताना दिसून येत आहे. अनेक भागात पाणीच चढत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जलकुंभही पूर्ण क्षमतेने भरले जाऊ शकत नाही. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नव्याने आखण्याची सूचना विभागाला केली आहे. जुन्या नाशकातील काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून अनुकूलता दर्शविण्यात आली असली तरी अद्याप त्यावर कार्यवाही होत नसल्याने खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.