नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्याविद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि.१७) बोलावली बैठक पुढे ढकलण्यात आली असून, बैठकीची निवडणुकीसाठीची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारेदिली.महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेक डून अधिसभा व कार्यकारी प्रतिनिधी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार गुरुवारी १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत विद्यापीठ मुख्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मतदानानंतर तत्काळ मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली होती. परंतु विद्यापीठाकडून कोणतेही स्पष्ट कारण ने देता ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार अधिसभा व कार्यकारी प्रतिनिधी यांची निवड करण्यात येते. या पदांकरिता नामांकन पत्र भरणे, नामांकन पत्रांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेणे व निवडणूक लढविणऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करणे हा कार्यक्रम परिपत्रकातील निर्धारित मुदतीत व विद्यापीठ अध्यादेशातील तरतुदींनुसार झालेला आहे. आता केवळ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची बैठक बोलावून निवडणूक प्रक्रिया राबविण्याची औपचारिका उरलेली असताना ही निवडणूक प्रक्रिया पूढ ढकलण्यात आली असून, नवीन तारीख लवकरच परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकात झालेल्या बदलांविषयी विद्यापीठाकडून विद्यार्थी परिषदेच्या सर्व सभासदांना ई-मेल व दूरध्वनीद्वारे कळविण्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आरोग्य विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 1:30 AM