शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

संगमेश्वरातील राजकारणात बदल

By admin | Published: May 27, 2017 11:47 PM

संगमेश्वर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील लढत लक्षवेधी ठरली. माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना शिवसेनेचे राजाराम जाधव यांनी पराभूत केले.

राजीव वडगे। लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील लढत लक्षवेधी ठरली. माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना शिवसेनेचे राजाराम जाधव यांनी पराभूत केले. सर्वसामान्य व कट्टर शिवसैनिकाने मातब्बर उमेदवार असलेल्या सोनवणेंना धूळ चारल्यामुळे संगमेश्वर भागातील राजकारण ढवळून निघाले आहे. संगमेश्वर ते मार्केट यार्डचा परिसर प्रभाग क्र. ८ मध्ये मोडतो. मातब्बर उमेदवारांच्या लढतीमुळे या प्रभागाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले होते. विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी नरेंद्र सोनवणे यंदा भाजपाकडून उमेदवारी करीत होते. शहरातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांची खास ओळख. शिवाय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे; मात्र प्रभागातील सातत्याने कमी होत असलेला जनसंपर्क व रखडलेली विकासकामे यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे राजाराम जाधव सलग पाचव्यांदा न.पा.ची निवडणूक लढवित होते.  २००२ मध्ये सखाराम घोडके या विद्यमान मातब्बर नगरसेवकाचा पराभव करीत या सामान्य शिवसैनिकाने आपली ओळख केली होती. नंतरच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही; मात्र दत्त मंदिर व शिवसेनेच्या माध्यमातून सतत सक्रिय राहणारे राजाराम जाधव यांच्याबद्दल सहानुभूती होती. एकनिष्ठ शिवसैनिक ही त्यांची खास ओळख. या बाबी त्यांना विजयासाठी कामी आल्या आणि त्यांनी पुन्हा एका मातब्बर विद्यमान नगरसेवकाचा पराभव करीत इतिहास घडविला आहे. महिला राखीव गटात शिवसेनेचे शहरप्रमुख रामा मिस्तरी यांच्या पत्नी सुनीता मिस्तरी यांना भाजपाच्या दीपाली विवेक वारूळे यांनी पराभूत केले. संगमेश्वर विभागाचे भाजपा प्रमुख विवेक वारूळे यांच्या त्या पत्नी आहेत. शिवसेना उमेदवारांच्या बंडखोरीमुळे भाजपाला येथे विजय सुकर झाला. ८ अ या महिला राखीव गटात शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश गंगावणे यांच्या पत्नी पुष्पा  गंगावणे ह्या विजयी झाल्या. राजेश गंगावणे यांनी केलेली कामे  व सुशिक्षित परिवार यामुळे  त्यांना विजय मिळणे सुकर झाले. प्रभाग ८ मध्ये तीन शिवसेना व एक भाजपाला जागा राखण्यात यश मिळाले आहे.प्रभाग ८ क मधील दोन विद्यमान नगरसेवकांच्या लढतीत माजी उपमहापौर सेनेचे सखाराम घोडके स्वीकृत नगरसेवकाने प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजय मिळवून दाखविला आहे. यापूर्वी झालेल्या प्रभाग पद्धतीच्या दोन निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. १९७८ पासून सतत उमेदवारी करून नगरसेवक पद पटकाविणारे घोडके यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. २००२ व २०१३ मध्ये त्यांचा पराभव झाला होता; मात्र दोन्ही वेळेस स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली होती. सलग आठ निवडणुका लढविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. घोडके यांनी प्रभागात केलेली कामे डिजिटल बोर्ड, प्रवेशद्वार कमानी, पाणीपुरवठा, रस्ते ही कामे त्यांना कामी आली. एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ, नगरपालिका कामकाजाचा अनुभव त्यामुळे त्यांचा दबदबा आहे. ह्या सर्व बाबी त्यांना विजयासाठी कामी आल्या. त्यामानाने विद्यमान नगरसेवक गुलाब पगारे (भाजपा) सर्वच बाबतीत तोकडे पडले. संगमेश्वर हा भाग त्यांच्यासाठी नवा होता. येथे संपर्क कमी होता. त्यामुळे ३८६५ मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला.