नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर सुरू असलेल्या नवीन उड्डाणपुलाचे कामांतर्गत जुन्या आणि नवीन आणि उड्डाणपूल जोडण्यासाठी रॅम्पपासून दोन्ही बाजूस फेज २ मध्ये १०० मीटर भिंत उभारण्याचे काम सुरू होत असल्याने या भागातून मुंबई -नाशिकमार्गे मालेगावकडे जाणारी आणि मालेगावहून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून एकेरी मार्गाने वळवण्यात आली आहे.
जुन्या उड्डाणपुलावरील मुख्य महामार्गांवरील उड्डाणपुलापासून १०० मीटरपर्यंत स्लो लेन वाहतूक बंद करण्यात आली असून, या मार्गावरील मुंबईकडून मालेगावकडे व मालेगावहून मुंबईकडे फास्ट लेन वाहतूक एकेरी मार्गाने वळविण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या भिंतीचे काम सुरू असताना दोन्ही बाजुूकडील सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू राहणार आहे. यापूर्वी जुन्या उड्डाणपुलावरून मुंबईकडून मालेगावकडे आणि मालेगावकडून मुंबईकडे ब्रम्हा व्हॅली ते उड्डाणपूल रॅम्पपर्यंत या पूर्वी फास्ट लेन आणि स्लो लेने वाहतूक सुरू होती. आता जुन्या उड्डाणपूल रॅम्पजवळ भिंतीचे काम सुरू होणार असल्याने स्लो लेनने प्रवेश बंद करून सर्व प्रकारची वाहतूक जुन्या उड्डाणपुलावरून शंभर मीटर एकेरी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग असा :
जुन्या उड्डाणपुलावरून मुंबईकडे जाणारी वाहने ब्रह्मा व्हॅली स्कूल ते उड्डाणपूल रॅम्पपर्यंत रोड दुभाजकाजवळील फास्ट लेनचा वापर करून तेथून डाव्या बाजूने वळण घेऊन सर्व्हिसरोडने धुळ्याकडे जातील. सर्व्हिसरोडने धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक उड्डाणपूल रॅम्प येथून उजवीकडे फास्ट लेनचा वापर करून ब्रह्मा व्हॅली स्कूलपर्यंत जातील व पुढे दोन्ही लेनचा वापर करतील, अशी सूचना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केली आहे.