वणी : बदलते वातावरण व घसरत्या तपमानामुळे द्राक्ष उत्पा दकां मधे चिंतेचे वातावरण असुन द्राक्षबागांवर भुरी लालकोळी व पिंकबेरीच्या प्रादुर्भावा ची शक्यता उभी ठाकल्याने उत्पादक अस्वस्थ आहेतदिंडोरी तालुक्यात द्राक्ष बागा बहरू लागल्या आहेत थॉमसन सोनाका काळी पर्पल याबरोबर विविध जातीच्या द्राक्षउत्पादनात अग्रेसर असणार्या तालुक्यात सध्या बदलत्या वातावरणा ने उत्पाद कांची काळजी वाढविली आहे तालुक्यातील काही भागात द्राक्षखुडणी सुरू आहे तर काही ठिकाणी द्राक्ष खरेदीसाठी व्यापारीवर्गाकडून चाचपणी सुरू आहे स्थानिक व्यापार्याबरोबर परप्रांतीय व्यापारीही या कार्यप्रणालीत समाविष्ट आहेतगुजरात राजस्थान, उतर प्रदेश, बिहार, कोलकाता, व इतर खरेदीदार राज्यातील व्यापार्यांची संख्या पाहुन उत्पादकांचाही उत्साह दुणावला मात्र या उत्साहाला नजर लागली ती अनैसिर्गक वातावरणाची सध्यिस्थतीत थंडीच्या प्रमाणात वाढ़ झाल्याने तपमान घसरले आहे नेक के हे च वातावरण द्राक्ष बागांसाठी मारक आहें भुरी लालकोळी पिंकबेरी याच्या प्रादुर्भावा ची शक्यता वाढली आहे द्राक्षामधे साखरभरणीस अटकाव द्राक्षमण्यांचा रंग बदलणे उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होणे अशा प्रतिकुल परिस्थीतीला सामोरे जावे लागण्या ची. चिन्हे दिसु लागल्याने उत्पादक हतबल झाले आहेत कारण स्थानिक बाजार पेठ, परराज्यीय बाजारपेठ याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठामधे दिंडोरी तालुक्यातील द्राक्षा चा नाव लौकिक आहें.मात्र निसर्गा ची अव कृपा झाल्याने काळ जीच्या छटा उत्पाद कांच्या चेहर्यावर दिसत आहे कारण अशा वातावरणामुळे व्यापारी कमी भावात द्राक्ष खरेदी ची मागणी करित आहेत याचीच धास्ती उत्पादकानी घेतली आहे याबरोबर मका हरभरा तुर ज्वारी याकांनाही घसरत्या तपमानाचा मोठा फटका बसला असुन उत्पादन घटीची भीती व्यक्त करण्यात येत आहे .
बदलते वातावरण,घसरत्या तपमानामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 7:15 PM