शहरं
Join us  
Trending Stories
1
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
2
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
3
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
4
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
5
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
6
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
7
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
8
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
9
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
10
"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला
11
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
13
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
14
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
15
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
16
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
17
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
18
Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
19
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
20
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?

नाशिक परिक्षेत्रात चारित्र्याचे दाखले आता आॅनलाइन

By admin | Published: January 03, 2017 11:48 PM

विनय चौबे : नागरिकांची सोय, पोलीस स्थापना दिनाचे औचित्य; नाशिक विभागात सुविधा

नाशिक : नागरिकांना शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी शासनाने ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या  आहेत़ त्यामध्ये पोलीस विभागाशी संबंधित वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी या सुविधेचाही समावेश असून, नाशिक परिक्षेत्रातील नाशिक (ग्रामीण), धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन प्रणालीद्वारे काम सुरू झाल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिली आहे़  सामान्य नागरिकांना शासकीय, निमशासकीय नोकरी तसेच खासगी क्षेत्रातही पोलिसांकडील वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे़ या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना वारंवार पोलीस ठाण्यांच्या चकरा माराव्या लागत असल्यामुळे वेळ व पैसा या दोहोंचाही अपव्यय होत होता़ यामुळे पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांसाठी आॅनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या दाखल्यांसाठी नागरिकांना आता पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रकरण घेऊन जाण्याची आवश्यकता नाही़  नागरिकांना वर्तन व पूर्वचारित्र पडताळणी, सुरक्षारक्षक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, पारपत्र (पासपोर्ट), तसेच क्लिअरन्स सर्टिफिकेट अ‍ॅब्रॉड अशा विविध सेवा आपले सरकार या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांनी या सुविधेचा वापर करूनच सादर करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे़ (प्रतिनिधी)