औरंगाबाद महामार्गावरील लाखलगाव-गंगापाडळी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १३ जागांपैकी एक जागा बिनविरोध होऊन माजी सरपंच आत्माराम दाते, विकास जाधव यांच्या विकास पॅनलने ११ जागा जिंकल्या होत्या. सरपंचपद ओबीसी महिला राखीव झाल्याने सुरेखा कैलास वलवे यांना सरपंचपदाचा मान मिळाला. उपसरपंचपदासाठी आत्माराम दाते व अपक्ष सचिन बर्वे यांचे अर्ज आले. मात्र, सचिन बर्वे यांनी माघार घेतल्याने आत्माराम दाते यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी आत्माराम दाते, विकास जाधव, प्रदीप कांडेकर, स्नेहल मेहेंदळे, वैशाली अष्टेकर, बापू वड, चंद्रभागा कांडेकर, मंदाबाई कांडेकर, कल्पना चव्हाण, सुरेखा वलवे, शांताराम वलवे हे विजयी झाले. ग्रामविकास पॅनलच्या आशा वड आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी श्रीधर सानप यांनी काम पाहिले.
======
मोहगाव- बाभळेश्वरच्या सरपंचपदी भाग्यश्री टीळे
मोहगाव-बाभळेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जागेसाठी आरक्षित करण्यात आल्याने, सरपंचपदासाठी सुरेखा योगेश टिळे व भाग्यश्री अंबादास टिळे यांनी नामनिर्देशन पत्र भरले. निवड प्रक्रियेत भाग्यश्री टिळे यांना पाच तर सुरेखा टिळे यांना चार मते मिळाली. भाग्यश्री टिळे यांना बहुमत असल्याने सरपंचपदासाठी त्यांची निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी आकाश लगड व अंजना धनाजी टिळे यांनी नामनिर्देशनपत्र भरले. आकाश लगड यांना पाच व अंजना टिळे यांना चार मते मिळाली. त्यामुळे आकाश लगड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी सदस्य संजय साळवे, निर्मला गांगुर्डे, मोहन टिळे, सुरेखा टिळे, योगेश टिळे, अंजना टिळे, ललिता टिळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून चेतन गवळी व ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर यांनी काम पाहिले.
(फोटो १५ लाखलगाव) (फोटो १५ मोहगाव)