लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषद व कर्मचारी परिषद सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१८) मराठा हायस्कूलमध्ये मतदान होणार असून, लगेचच मतमोजणी करण्यात येणार आहे.दरम्यान, सहकार पॅनलने शुक्रवारी (दि.१६) जिल्हा परिषदेत प्रवेशद्वारावर प्रचार सभा घेऊन सत्ताधारी समता पॅनलवर आरोपांची राळ उठविली, तर त्याआधी गुरुवारी (दि.१५) समता पॅनलने दुपारी जिल्हा परिषदेत प्रचार सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली.जिल्हा परिषद व कर्मचारी परिषद सहकारी बॅँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असून, शुक्रवारी सहकार व समता पॅनलने प्रचार केला. शनिवारी (दि.१७) गाठीभेटींवर जोर राहणार आहे. शुक्रवारी (दि.१६) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सहकार पॅनलने प्रचार सभा घेतली. पॅनलचे नेते उत्तम बाबा गांगुर्डे यांनी सहकार पॅनल सत्तेत आल्यास सभासदांना ११.५ टक्के दराने कर्जावरील व्याजदर केले जाईल. सभासदांना गेल्या काही वर्षांपासून वाटप न केलेला कल्याण निधी वाटप करण्यात येईल. दहा कोटी रुपये पडून असल्याने सीडी रेश्यू ६० ते ६२ टक्केझाल्याचा आरोप गांगुर्डे यांनी केला. रवि थेटे यांनी सांगितले की, समता पॅनलने घराणेशाहीची परंपरा सुरू केली आहे. नोकरभरती करताना पारदर्शकता न राबविता नातलगांनाच नोकरीत घेतल्याचा आरोप केला. यावेळी पॅनलचे उमेदवार रवींद्र आंधळे, रामचंद्र हिरे, छाया पाटील, राजेंद्र पवार, प्रमोद निरगुडे, नीलेश देशमुख, प्रवीण कांबळे, रमेश जेजूरकर, अनिल घुगे, प्रकाश थेटे, नंदकिशोर सोनवणे आदि उपस्थित होते. तत्पूर्वी गुरुवारीही समता पॅनलनेही जिल्हा परिषदेत सभा घेऊन सत्ताधारी संचालकांच्या काळात बॅँकेच्या विकासाची माहिती दिली. यावेळी पॅनलचे नेते महेश आव्हाड यांच्यासह उमेदवार विजयकुमार हळदे, भाऊसाहेब खातळे, अजित आव्हाड, धनश्री कापडणीस, मंदाकिनी पवार आदींसह उमेदवार उपस्थित होते.
आरोप- प्रत्यारोपांनी प्रचार शिगेला; रविवारी मतदान
By admin | Published: June 17, 2017 1:09 AM