नाशिक - शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाºयांनी निकाल जाहीर केला. त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित बोलू शकत नाहीत अशा परिस्थितीत ते मराठीतून निकाल कसे देऊ शकतात, असा संशय व्यक्त करीत निकाल बाहेरून लिहून आणल्याचा गंभीर आरोप राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी केला आहे.दोन दिवसांत जिल्हाधिकाºयांच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिवसेनेचेउमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अर्जावर सहाणे यांनी तीन हरकती घेतल्या आहेत.
नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:25 AM