दिनांक २९ जुलै रोजी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींनी टाकळी विंचूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये बालविवाहास कायद्यानुसार प्रतिबंधक कायदा असताना अल्पवयीन मुलीचा विवाह घडवून आणला. टाकळीचे ग्रामविकास अधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी शशिकांत माधव कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यात पुरोहित भंडारी गुरूंसह, विजय भास्कर मौले, शोभा विजय मौले, वर विशाल प्रकाश जाधव , श्रीमती भारती प्रकाश जाधव, सर्व रा. , लासलगाव व संदीप दत्तू कदम, रा. टाकळी विंचूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ठोंबरे व तपासी अंमलदार पो. ना. एस. शिंदे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:14 AM