नाशिक : महानगरपालिकेच्या कोरोनाविरोधातील लढाईचे मुख्य केंद्र असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी महिनाभरापासून अनुपस्थित रहात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर वैद्यकीय अधिक्षकांनी गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित केले आहे.झाकीर हुसेन रुग्णालयात दररोज दाखल होणारे नवीन रुग्ण तसेच बाधित रुग्णांच्या तपासण्यांपासून त्यांच्या उपचारापर्यंत सर्व वैद्यकीय उपचारांची पूर्तता केली जाते. त्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, सहायक, वॉर्डबॉय असे एकूण मिळून ९० कर्मचारी कार्यरत आहेत. सर्व कर्मचाºयांना शासनाच्या वतीने निर्धारीत नियमानुसार काम आणि सुट्टी असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व कर्मचारी हे नियमितपणे कार्यरत आहेत. मात्र, त्यात एक कोविड लॅब तंत्रज्ञ आणि कोविड कक्षात नेमणूक असलेला अन्य एक कर्मचारी गत महिन्यापासून सेवेवर हजर झालेले नव्हते. महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी हे दोन कर्मचारी गैरहजर रहात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ या कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपल्या कर्तव्याची पूर्तता न केल्याबद्दल त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाºयांवर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आल्यास आपसूकच निलंबनदेखील होते.महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात हा प्रकार निदर्शनास आल्याने मनपाच्या अन्य रुग्णालयांमध्येदेखील अशा प्रकारे कर्मचारी गैरहजर राहत आहेत का? याबाबत चौकशी करुन तेथील प्रमुखांनी त्याबाबतचे अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशदेखील डॉ. त्र्यंबके यांनी दिले आहेत. त्यामुळे आता सर्वच मनपा रुग्णालयातील कर्मचाºयांच्या उपस्थितीबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.
गैरहजर राहणाऱ्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 1:55 PM
नाशिक : महानगरपालिकेच्या कोरोनाविरोधातील लढाईचे मुख्य केंद्र असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी महिनाभरापासून अनुपस्थित रहात ...
ठळक मुद्देनियमानुसार निलंबन झाकीर हुसैन रुग्णालयातील प्रकार उघडकीस