शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

७४ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल : कुंभनगरी नाशकात महिला अत्याचाराविरोधात पोलिसांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 4:52 PM

सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा ह्यटास्कह्ण संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आला होता.

ठळक मुद्दे विनयभंग, बलात्कारांसह अपहरणाच्या गुुन्ह्यांचा तत्काळ निपटारारखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला अखेर 'मुहूर्त'

नाशिक : कुंभनगरी नाशकात महिलांना भयमुक्त वातावरणात वावरता यावे, यासाठी शहर पोलिसांच्या निर्भया पथकासह सर्वच पोलीस ठाण्यांमधील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वज्रमूठ केली आहे. केवळ डिसेंबर महिन्यात परिमंडळ-१मधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महिलांसंबंधी विविध ७४ गुन्ह्यांचा निपटारा करत संबंधित संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.शहरात महिला अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अल्पवयीन मुलींचे फूस लावून अपहरण करणे, विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक छळ, मारहाण, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांवर आता पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत.महिलांवरील अत्याचाराच्या प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी व पीडितांना जलद न्याय मिळावा, या हेतूने शहर पोलिसांनी वर्षअखेरीस विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अपहरण, विनयभंग, बलात्कार, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांपैकी ७४ गुन्ह्यांचा तपास करून संशयित आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच १८ वर्षांच्या पुढील ७० बेपत्ता महिलांचा शोध घेत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोमवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत दिली.सात पोलीस ठाण्यांना विशेष 'टास्क'सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा ह्यटास्कह्ण संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आला होता.-रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला अखेर 'मुहूर्त'पोलिसांनी तपास करून रखडलेले अपहरणाचे १४, विनयभंग- २०, बलात्काराचे ३ व विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी दाखल असलेल्या ३७ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात यश मिळविले, तसेच महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या २९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २३३ अकस्मात मृत्यू, १ हजार ७२ तक्रार अर्ज, २६६ प्रलंबित मुद्देमाल निर्गती व ५०४ इतर गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आल्याचे पाण्डेय म्हणाले.

या महिला पोलिसांचा गौरवसहायक निरीक्षक उमा गवळी, उपनिरीक्षक सी. एस. पाटील, जयश्री अनवणे, प्रियंका गायकवाड, योगिता कोकाटे, चांदनी पाटील, अनिता पाटील, हवालदार पार्वती राठोड, क्षितिजा रेड्डी, सरला घोलप, ललिता वाघ, जयश्री कांगणे, शुभांगी आवारे, रीना आहेर, सोनाली वडारकर यांना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे