नांदगाव : चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासाठी देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. बाबू जगजीवनराम यांच्या नवे केंद्र सरकार व राज्य सरकारने आयोग स्थापन करावा, जगतगुरु रोहिदास महाराजांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, देशातील चर्मकार समाजातील १५५६पोटजातींना रविदासीया या एकाच नावाने दाखल मिळावा, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे देण्यात येणारे अनुदान ५० हजार रु पये करण्यात यावे, आदी मागणीसाठी येथील तालुका चर्मकार संघाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. या निवेदनात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फेदेण्यात येणाऱ्या कर्जासाठीच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात,तसेच मायक्र ो फायनसान्ससाठी कुठल्याही प्रकारचे जमीन घेण्यात येऊ नये,महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी संत रोहिदास भवन बांधून देण्यात यावे, समाजमंदिरासाठी आणि तसेच जागेसाठी निधी उपलब्ध करून द्यावे,महाराष्ट्रातील गट कामगारांसाठी स्टॉल देण्यासाठी प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, गुजराथ येथे मृत जनावरांचे कातडे दलित समाजातील चार लोकांना गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यात आला. संबधिताविरु द्ध कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत . मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष भीमराज काटकर, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम,शहराध्यक्ष प्रवीण पवार, मनमाडचे शहर अध्यक्ष शैलेश सोनवणे, मधुकर मोरे,रामभाऊ सोनावणे, विजय सोनावणे,सागर मोरे, मुकेश सोनावणे,दीपक देवरे, योगेश पगारे, संजय मोरे, राजू मोरे,सचिन मोरे,बबन आडसुळे,शाहनूर बडोदे, त्र्यंबकसातपुते आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर )
चर्मकार संघातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: July 22, 2016 12:27 AM