नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास व कासारवाडी ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होऊन दोन्ही ठिकाणी परिवर्तन पॅनलने झेंडा फडकविला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
चास ग्रामपंचायत निवडणुकीत १३ पैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित नऊ जागांसाठी परिवर्तन व ग्रामविकास पॅनलमध्ये लढत होऊन परिवर्तन पॅनलने पाच जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव खैरनार, उपसभापती संजय खैरनार, माजी सरपंच चंद्रशेखर खैरनार, जगन्नाथ खैरनार व कचरू खैरनार यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन, तर पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड व बंडू भाबड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलमध्ये लढत झाली. वॉर्ड एकमधून सुनील शिरसाठ, वनिराम खैरनार, कांता खैरनार हे विजयी झाले. वॉर्ड दोनमधून भानुदास किसन भाबड, रंजना मेंगाळ विजयी झाले. वॉर्ड क्रमांक तीनमधून अर्जुन जाधव व उषा जाधव निवडून आले. प्रभाग चारमधून मंदा सोमनाथ भाबड व रामदास भाबड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर यापूर्वी प्रभाग पाचमधून परिवर्तनचे पद्ममा सुभाष खैरनार, शिवाजी विठोबा खैरनार व मनीषा चंद्रशेखर खैरनार, तर चारमधून ग्रामविकासच्या मथुराबाई खैरनार या बिनविरोध निवडून आल्या होत्या.
------------------------------
कासारवाडी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होऊन परिवर्तन पॅनलने सत्ता हस्तगत केली. सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. कचरू शेळके, राजेंद्र शेळके, उल्हास शेळके, संजय शेळके, सुनील सांगळे यांच्या नेतृत्वाखाली संत बाळूमामा परिवर्तन पॅनल, तर पोपटराव शेळके, केरू शेळके, अशोक शेळके, भारत शेळके यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनलची निर्मिती केली होती. परिवर्तन पॅनलला सात जागा मिळाल्या, तर विरोधी पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. वॉर्ड एकमध्ये परिवर्तन पॅनलचे भारत माधव मधे, दीपाली योगेश मधे बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर एका जागेवर ज्योती सुनील खैरनार विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक दोनमधून जयश्री दत्तात्रय खैरनार विजयी झाल्या, तर अशोक वसंत देशमुख (२१८), सचिन गुलाब देशमुख (१९८) यांनी शरद देशमुख (१५१), शरद भाऊसाहेब देशमुख (१५३) यांचा पराभव केला. वॉर्ड क्रमांक तीनच्या तिन्ही जागा परिवर्तन पॅनलने पटकाविल्या. इंदूबाई सुनील सांगळे (२४६), विशाल राजेंद्र सांळुखे (२२९), अश्विनी दिनेश जगताप (२१९) यांनी योगीता भारत शेळके (१६३), योगेश काकड (१७२), अलका लोहकरे (१८९) यांचा पराभव केला.
------------------
सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथे जल्लोष करताना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते. (१९ कासारवाडी)
---------------------
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथे निकाल जाहीर होताच जल्लोष करताना कार्यकर्ते. (१९ दोडी)
===Photopath===
190121\19nsk_7_19012021_13.jpg
===Caption===
१९ कासारवाडी, १९ दोडी